acb held talathi in bribe case near sangli Saam tv
क्राईम

Sangli News : आदर्श पुरस्कार प्राप्त तलाठी 10 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला; सांगलीत खळबळ

acb held talathi in bribe case near sangli : आदर्श तलाठ्याने लाच घेतल्याच्या या प्रकारामुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा पाेलिस दल घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

विजय पाटील

आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त तलाठ्याला 10 हजार रुपयांची लाच घेताना सांगलीच्या कडेगाव येथे रंगेहात पकडण्यात आले आहे. वैभव तारळेकर असे तलाठ्याचे नाव असून तो कडेगाव तालुक्यातील तडसर येथे कार्यरत होता.

शेत जमिनीची नोंद घालून सातबारा उतारा देण्यासाठी शेतकऱ्याकडे तलाठी तारळेकर याने 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच घेताना तारळेकर याच्या घराजवळच एसीबीने त्याला रंगेहात पकडले.

शासनाने वैभव तराळेकर यास 2024 मध्ये आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याचबरोबर कडेगाव तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष पदाची धूरा सांभाळात आहेत. आदर्श तलाठ्याने लाच घेतल्याच्या या प्रकारामुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT