अवधूत साठे सेबीच्या रडारवर
सेबीची परवानगी न घेता आर्थिक सल्ला दिल्याचा संशय
कोण आहेत अवधूत साठे?
शेअर मार्केटमध्ये जर कोणी काही गडबड किंवा बेकायदेशीररित्या कही केले तर त्यांच्यावर सेबी कारवाई करते. दरम्यान,आता अवधूत साठे हे सेबीच्या रडारवर आहे. अवधूत साठे यांनी शेअर मार्केटमधील फिनएफ्लूएन्सर म्हणून ओळखले जाते. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. त्यांनी युट्यूब चॅनेलद्वारे लाखो तरुणांना फायनान्सबाबत माहिती दिली आहे. दरम्यान आता यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्याची शोध मोहिम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
अवधूत साठे यांनी सेबीमध्ये नोंदणी न करता आर्थिक सल्ला दिला आहे. या आरोपावरुनच त्यांच्याविरोधात शोध मोहिम सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवधूत साठे यांनी सेबीची परवानगी न घेऊन अनधिकृत पद्धतीने आर्थिक सल्ले दिले आहेत. यातू तब्बल ४०० ते ५०० कोटींचा व्यव्हार झाल्याचा संथय आहे.
अवधूत साठे कोण आहेत? (Who Is Avdhoot Sathe)
अवधूत साठे हे मार्केट फिनएफ्लुएन्सर आहेत. त्यांना ट्रेडिंग गुरु म्हणूनदेखील ओळखले जाते. ते गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंगबाबत माहिती देतात. सोशल मिडिया आणि Karjat Trading Academy च्या माध्यमातून ते गुंतवणूकदारांना माहिती देतात. त्यांच्या चॅनलवर लाखो सब्क्रायबर आहेत.
अवधूत साठेंवरचे आरोप
नियमाबाहेर जाऊन शेअर मार्केटमधील गुंतवणूकीबाबत सल्ले दिल्याचा संशय
या सल्लांमधून ४०० ते ५०० कोटींचा व्यव्हार झाल्याची शक्यता
हेच शोधून काढण्यासाठी सेबीने तपासणी मोहिम राबवली आहे. अवधूत साठे हे सेबीच्या रडारवर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.