Raisin Price : चिनी बेदाण्याने मार्केट खाल्ले; महिन्याभरापासून बेदाणा दरात घसरण, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Pandharpur News : चायना मालाने मार्केटमध्ये कमी दरात वस्तू आणल्या. त्यानुसार चायनामध्ये उत्पादित केला जाणारा बेदाणा देखील भारताच्या बाजारात आणला जाऊ लागला आहे. याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे
Raisin Price
Raisin PriceSaam tv
Published On

पंढरपूर : सण उत्सवाच्या काळात बेदाण्याची मागणी वाढत असते. तर आगामी गौरी गणपती सणाच्या तोंडावर बेदाण्याचे दर प्रती किलो २० ते २५ रुपयांनी घसरले आहेत. महिनाभर नंतरही दरात घसरण सुरूच आहे. दर कमी झाल्याने बेदाणा उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान चीनमधून नेपाळमार्गे चोरट्या मार्गाने बेदाणा मार्केटमध्ये विक्रीसाठी आल्याचा हा परिणाम होत आहे.

यावर्षी सोलापूर, सांगली, सातारा यासह अनेक भागात मोठ्या प्रमाणावर बेदाण्याचे उत्पादन घेण्यात आले आहे. मागील वर्षभरापासून बाजारात बेदाण्याचे दर टिकून होते. यात बेदाण्याला उच्चांकी ४५० ते ५५० रुपये प्रती किलो दर मिळाला होता. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले होते. मात्र मागील महिनाभरापासून बेदाण्याच्या दरात घसरण सुरु झाल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे आहे. 

Raisin Price
Electric Shock : बांधावर घातलेल्या तार कंपाउंडमुळे युवकाचा गेला जीव; ऊसाच्या संरक्षणासाठी सोडला होता विद्युत प्रवाह

चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला ४४० पर्यंत दर 

बेदाण्याची दरात प्रती किलो मागे २० ते २५ रुपये दर कमी झाले आहेत. सध्या पंढरपूर येथील बेदाणा बाजारात चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला ४२० ते ४४० भाव मिळाला आहे. काल झालेल्या बेदाणा सौैदे बाजारात सुमारे ६०० टन बेदाण्याची आवक झाली. प्रती किलो सरासरी २० रुपयांची घसरण धरली, तरी जवळपास १२ कोटी रुपयांचा आर्थिक फटका येथील शेतकर्यांना बसला आहे.

Raisin Price
Ganesh Utsav 2025 : गणेशोत्सवात लेसर बंदी; उल्लंघन करणाऱ्यावर होणार फौजदारी कारवाई

चिनी बेदाण्यावर बंदीची मागणी 

दरम्यान चिनी बेदाणा हा छुप्या पद्धतीने भारतातील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होत आहे. याचा परिणाम स्थानिक शेतकर्यांकडून उत्पादित केलेल्या बेदाण्याला चांगला दर मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे छुप्या पद्धतीने येणाऱ्या चिनी बेदाण्यावर बंदी घालावी, अशी मागणी बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापार्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com