Ganesh Utsav 2025 : गणेशोत्सवात लेसर बंदी; उल्लंघन करणाऱ्यावर होणार फौजदारी कारवाई

Kolhapur News : गणेशोत्सवातील मिरवणुकीदरम्यान लेसर लाईटच्या वापरामुळे डोळ्यांना दुखापती झाल्याच्या अनेक घटना मागील वर्षी समोर आल्या होत्या; याच अनुषंगाने यंदा हि बंदी घालण्यात आली आहे
Ganesh Utsav 2025
Ganesh Utsav 2025Saam tv
Published On

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या काळात आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत लेसर विद्युत रोषणाईचा उपयोग केला जातो. मात्र यातील लेसर अत्यंत घातक ठरत असल्याने गणेशोत्सवात लेसर बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. तर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर थेट फौजदारीची कारवाई करण्यात येणार आहे. 

यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. अर्थात काही दिवसांवर गणेशोत्सव आला असल्याने त्या अनुषंगाने आता तयारी सुरु झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांची देखील तयारी सुरु झाली आहे. गणेश मूर्ती बुकिंग पासून मिरवणुकीसाठी ढोल- ताशे व डीजेची बुकिंग देखील केली जात आहे. मात्र हे करत असताना कोल्हापूर जिल्ह्यात गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत तसेच इतर कार्यक्रमांदरम्यान लेसर लाईटचा वापर करता येणार नाही. 

Ganesh Utsav 2025
Zp School : मराठी सोबतच विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचेही धडे; मावळच्या जिल्हा परिषदे शाळेचा अभिनव उपक्रम

गतवर्षी आगमन मिरवणुकीत घडली होती घटना 

गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकीचे आयोजन केले जाते. त्यामध्ये मंडळांकडून लेसरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. गतवर्षी आगमन मिरवणुकीत भाविकांच्या डोळ्यांवर असे लेसर पडल्याने डोळ्यांचा पडदा बुबुळाला इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांचा विचार करत यंदा अशा घटना होऊ नये; यासाठी लेसर लाईट वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 

Ganesh Utsav 2025
Electric Shock : बांधावर घातलेल्या तार कंपाउंडमुळे युवकाचा गेला जीव; ऊसाच्या संरक्षणासाठी सोडला होता विद्युत प्रवाह

तर होणार फौजदारी कारवाई 

दरम्यान जिल्हाधिकारींनी गणेशोत्सवाच्या काळात म्हणजे २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान लेसरवर बंदी घातली आहे. त्या संदर्भातील आदेश काल जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जारी करण्यात आले आहेत. याचे काटेकोर पालन गणेश मंडळांना करावे लागणार आहे. अर्थात या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com