Investment Tips: फक्त १० हजार रुपयांची बचत तुम्हाला बनवेल करोडपती; समजून घ्या गणित

Mutual Fund, SIP Tips: जर तुम्हालाही भविष्यात करोडपती व्हायचे असेल पण तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी लाखो रुपये नसतील, तरीही तुम्ही दरमहा फक्त १० हजार रुपये गुंतवून १.७ कोटी रुपयांची बचत करू शकता.
Investment Tips
Mutual Fund, SIP Tipssaam tv
Published On

जर तुम्हाला वाटत असेल की करोडपती होण्यासाठी लाखो रुपयांची आवश्यकता आहे, तर तुम्हाला एकदा "SIP म्हणजेच सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन" बाबत माहिती असणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे थोड्या रकमेतूनही दीर्घकाळात मोठा पैसा जमवू शकता. जर तुम्ही दरमहा फक्त ₹१०,००० चा एसआयपी केली तर तुम्ही करोडपती होऊ शकता. तेही कोणत्याही मोठ्या जोखमीशिवाय, कसे ते समजून घेऊया.

दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर किती परतावा?

तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दरमहा ₹१०,००० गुंतवले तर तुम्हाला सरासरी १२% वार्षिक परतावा मिळतो. या दराने, जर तुम्ही २५ वर्षे सतत गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणूक रक्कम ३०,००,००० रुपये होईल. त्यावर तुम्हाला एकूण १,४०,२२,०६६ रुपये व्याज/परतावा मिळेल आणि एकूण रक्कम १,७०,२२,०६६ रुपये होईल. म्हणजेच फक्त ₹३० लाख गुंतवून तुम्ही ₹१.७ कोटी रुपयेपर्यंतचा पैसा जमा करू शकता.

Investment Tips
Vande Bharat news: अरे वा! प्रवासाच्या १५ मिनिटे आधीच बुक करू शकता वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या गणित

गुगलवर “SIP कॅल्क्युलेटर” शोधा.

Groww, Zerodha, ET Money सारख्या वेबसाइटला भेट द्या.

तुमची मासिक गुंतवणूक, अंदाजे परतावा आणि गुंतवणूक कालावधी प्रविष्ट करा.

आता तुम्ही किती वेळेत किती निधी तयार होईल ते पाहू शकता.

चक्रवाढीची जादूची कमाल

एसआयपीमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ. चक्रवाढ म्हणजे तुमच्या कमाईत व्याज देखील जोडले जाते. मग त्या व्याजावरही व्याज मिळते. अशाप्रकारे तुमचे पैसे कालांतराने खूप वाढतात. उदाहरणार्थ, पहिल्या ५ वर्षांत तुमचे पैसे हळूहळू वाढतील, परंतु १५-२० वर्षांनंतर ते वेगाने वाढू लागतील. म्हणून, गुंतवणूक जितकी जास्त असेल तितका परतावा जास्त मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com