नवीन वर्ष सुरु झाले आहे. लवकरच नवीन आर्थिक वर्षदेखील सुरु होईल. जुन जुलै महिन्यात इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करावा लागतो. प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना आयकर रिटर्न फाइल करावा लागतो. आयटीआर फाइल करताना वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी वेगवेगळे फॉर्म असतात. आयटीआरचे एकूण ७ फॉर्म आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या उत्पन्न गटातील लोकांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या गटातील लोक कोणता आयटीआर फॉर्म भरतात.यामध्ये ITR 1,ITR 2,ITR 3, ITR 4 या फॉर्मचा समावेश आहे. (Income Tax Return)
ITR 1
ITR 1 हा फॉर्म ५० लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे लोक भरु शकतात. हे उत्पन्न सॅलरी किंवा पेन्शनमधून मिळालेले असावे. यामध्ये काही इतर गोष्टींमधून घेतलेले उत्पन्नाचा देखील समावेश आहे. म्हणजे घर किंवा प्रॉपर्टीमधून येणारे उत्पन्न. म्हणजेच जर तुम्ही घर भाड्याने दिले असेल तर त्यातून येणारे उत्पन्न. याचसोबत शेतीतून जर ५००० रुपयांची कमाई हो असेल तर तु्म्हाला टॅक्स भरावा लागतो.बिझनेस करणारे लोक हा फॉर्म भरु शकत नाही.
ITR 2
ITR 2 हा फॉर्म वार्षिक उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या लोकांसाठी आहे. ज्यांची कमाई ही कॅपिटल गेन्समधून होते. याचसोबत एकापेक्षा जास्त हाउस प्रॉपर्टीमधून होणाऱ्या कमाईचादेखील समावेश आहे. जे लोक परदेशात काम करतात किंवा त्यांची परदेशात संपत्ती आहे त्यातून ते पैसे कमावतात. ते लोक हा फॉर्म भरु शकतात. तसेत शेतीतून ५ हजारांपेक्षा जास्त उत्पन्न घेणारे लोक हा फॉर्म ङरु शकतात.
ITR 3
ITR 3 हा फॉर्म हिंदू संगठीत परिवार (HUF)द्वारा भरला जातो. ज्या लोकांचे उत्पन्न बिझनेस किंवा इतर गोष्टींतून येते त्यांचा समावेश या गटात होतो.ITR 2 मधून कमाई करणारे लोकदेखील हा फॉर्म भरु शकतात. कोणत्याही कंपनीत किंवा फर्ममध्ये पार्टनर असलेले लोक हा फॉर्म भरु शकतात. तसेच आर्थिक वर्षात इक्विटी अनलिस्टेड शेअरमध्ये गुंतवणूक केलेले लोक हा फ़ॉर्म भरु शकतात. सॅलरी, हाउस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन, लॉटरीमधून कमाई करमारे लोक हा फॉर्म भरु शकतात.
ITR 4
जे लोक पार्टनरशिपमध्ये फर्म चालवतात ते लोक हा फॉर्म भरु शकतात. ज्यांचे उत्पन्न 44एडी और 44एई अंतर्गत येते त्यांच्यासाठी हा फॉर्म असते. ज्यांची सॅलरी किंवा पेन्शन ५० लाखांपेक्षा जास्त आहे ते लोकही हा फॉर्म भरु शकतात. तसेच बिझनेसचा टर्नओव्हर २ कोटींपेक्षा जास्त असेल तर ITR 4 भरु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.