
इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी अनेक लोक काही ना काही करत असतात. इन्कम टॅक्स जास्त जाऊ नये म्हणून कुठेतरी गुंतवणूक करतात. परंतु तुम्ही इन्कम टॅक्स वाचवायच्या नादात काही चुकीचं तर करत नाही ना याकडे एकदा लक्ष द्या. जर तुम्ही चुकूनही काही चुकीचे काम केले तर तुम्हाला इन्कम टॅक्सकडून नोटीस येऊ शकते.
जे लोक नियमापेक्षा जास्त रोख रक्कमेत व्यव्हार करतात त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस येते. तुम्ही या गोष्टी कधीच करु नका अन्यथा तुम्हालाही आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. (Income Tax)
१० लाखांची एफडी (10 Lakh Rupees FD)
जर तुम्ही एफडीमध्ये १० लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. तुम्ही ऑनलाइन, ऑफलाइन किंवा रोख रक्कमेने हे पैसे गुंतवले असले तरीही तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. त्यामुळे तुम्ही नेहमी चेकच्या आधारे पैसे जमा करा.
कॅश डिपॉझिट (Cash Deposite)
जर तुम्ही कोणत्याही बँकेत एकापेक्षा जास्त खात्यांमध्ये १० लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर तुम्हाला नोटीस येऊ शकते. जर तुम्ही १० लाख रुपये कॅश जमा करत असाल कर आयकर विभागाला सांगावे लागेल.
प्रॉपर्टीचे व्यव्हार
जर तुम्ही ३० लाख किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे प्रॉपर्टी व्यव्हार करत असाल तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते.यामध्ये तुम्हाला हे पैसे कुठून आणले असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात.
शेअर्स, बॉन्ड, म्युच्युअल फंड (Mutual fund)
जर एखादा व्यक्ती वर्षभरात १० लाखांपेक्षा जास्त किंमतीचे शेअर्स,म्युच्युअल फंड खरेदी करत असेल तर त्याबाबत आयकर विभागाला माहिती देणे गरजेचे आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.