UPI Payment Saam Tv
बिझनेस

VISA आणि Master Card वापरुन करता येणार UPI पेमेंट; जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे

UPI Payment Through VISA And MasterCard: भारतात आजकाल सर्व व्यव्हार डिजिटल होतात. सर्वजण UPI चा वापर करुन पेमेंट करतात. आता तुम्ही VISA आणि Master Card वापरुनदेखील पेमेंट करु शकणार आहात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

VISA And MasterCard UPI Payment:

भारतात आजकाल सर्व व्यव्हार डिजिटल होतात. सर्वजण UPI चा वापर करुन पेमेंट करतात. त्यामुळे रोख रक्कम ठेवणे कमी झाले आहे. परंतु यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे असणे गरजेचे असते. मात्र, आता तुम्ही Rupay क्रेडिट कार्डच्या मदतीनेदेखील UPIपेमेंट करु शकता.

HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक आणि फेडरल बँक यासारख्या देशातील अनेक बँकांनी व्हर्च्युअल RuPay क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. आता ग्राहक व्हर्च्युअल क्रेडिट कार्डच्या मदतीने UPI पेमेंट सहज करता येईल.

ज्या ग्राहकांकडे व्हिसा किंवा मास्टरकार्ड आहे ते लोक व्हर्च्युअल क्रेडिट कार्डसाठी अर्ज करु शकतात. या क्रेडिट कार्डच्या मदतीने ग्राहक कोणत्याही UPI अॅपवरुन सहज व्यव्हार करु शकतात.

व्हिसा आणि मास्टरकार्डद्वारे होणार UPI पेमेंट

जर तुमच्याकडे व्हिसा किंवा मास्टरकार्ड असेल तर तुम्ही RuPay क्रेडिट कार्डसाठी अर्ज करु शकतात. परंतु याआधी तुमची बँक RuPay क्रेडिट कार्डची सुविधा देते का हे पाहावे लागेल. जर तुमची बँक तुम्हाला ही सुविधा देत असेल तर तुम्ही व्हर्च्यअल कार्डच्या मदतीने UPI पेमेंट करु शकतात.

तुम्ही तुमचे व्हर्च्युअल कार्ड आपल्या UPIशी लिंक करु शकतात. त्यानंतर गुगल पे, पेटीएम किंवा फोन पे या अॅपवरुन पेमेंट करता येणार आहे. याशिवाय तुम्ही मास्टरकार्डवर मिळणाऱ्या क्रेडिट कार्ड लिमिटचा वापर करुन RuPay क्रेडिट कार्ड वापरु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वाघोली–लोणीकंद परिसरात डंपरचे ओव्हरलोडिंग,दगड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला

Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवार पूजेची मांडणी आणि कलश स्थापना कशी करावी?

Train Accident: मोठा रेल्वे अपघात, ट्रेनच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू

Shocking : माणुसकीचा अंत! २० चिमुकल्यांना डांबले अन् मिटिंगसाठी गेल्या, अंगणवाडी सेविकेचा भावनाशून्य कारभार | VIDEO

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शिवसेना फुटीवेळी 'त्या' आमदाराने शिंदेंकडून ५० कोटी घेतले, भाजप आमदाराचा दावा

SCROLL FOR NEXT