CIBIL: ७५० च्या वरती क्रेडिट स्कोर कसा ठेवाल? क्रेडिट कार्ड वापरताना या गोष्टी ठेवा डोक्यात

CIBIL Score : बँकेतून कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा सिबील स्कोर हा चांगला असला पाहिजे. जर सिबील स्कोर कमी असेल तर बँकेतून तुम्हाला कर्ज मिळत नाही. जर कर्ज मिळालं तरी त्याचे त्याचे व्याजदर हे जास्त असते. क्रेडिट कार्डचा वापर करताना आपले सिबील स्कोर हे सुधारता येते परंतु कार्डचा जास्त वापर केला तर आपला स्कोर हा कमीदेखील होत असतो.
CIBIl Score
CIBIl Score Yandex
Published On

How To Maintain CIBIL Score with Credit Card:

क्रेडिट कार्डचा उपयोग अनेकजन करत आहेत. क्रेडिट कार्डच्या मदतीने आपण शॉपिंग, आणि दैनिक गरजांच्या वस्तूंची खरेदी करतो. कार्डद्वारे पेमेंट केल्याने आपल्याला बँकेकडून काही रिवार्ड्स मिळत असतात. परंतु कधी-कधी वेगवेगळ्या ठिकाणी क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे आपला सिबील स्कोर कमी होत असतो. (Latest News)

सिबील स्कोर कमी झाल्यामुळे कर्जासाठी अर्ज केला तर आपले कर्ज प्रकरण नाकारण्यात येते. जर कधी कर्जाचा अर्ज मान्य झाला तर आपल्याला अधिक व्याजदराने कर्ज दिले जाते. यामुळे आपली बँकिंग हिस्टरी नीट असणं आवश्यक आहे. यासाठी क्रेडिट कार्ड वापरताना योग्य काळजी घेतली पाहिजे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वापर कमी ठेवा

क्रेडिट कार्डचा उपयोग करताना नेहमी कार्डच्या वापरावर नियंत्रण ठेवावे. क्रेडिट कार्डचा वापर ३० टक्क्यांपेक्षा कमी असावा. जर या प्रमाणापेक्षा जास्त वेळा क्रेडिट कार्डवर पेमेंट केलं तर त्याचा आपल्या क्रेडिट स्कोरवर वाईट प्रभाव पडत असतो. जर ३० टक्क्यांपेक्षा जास्त वेळा कार्डचा वापर केला असेल तर आधीच्या पेमेंट स्टेटमेंट येऊ द्या ते बील भरा आणि त्यानंतर कार्डवरून खरेदी करा.

क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरली पाहिजेत. तुम्ही कोणतेही बिल भरण्यास उशीर केल्यास किंवा देय तारखेनंतर ते जमा केल्यास, त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होत असतो. या कारणास्तव कर्जाचा कोणताही हप्ता उशिरा भरू नये. याचबरोबर एकापेक्षा जास्त वैयक्तिक कर्ज घेऊ नये. कारण जेव्हा तुम्ही वारंवार वैयक्तिक कर्ज घेता तेव्हा बँक तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अस्थिर व्यक्ती मानते. त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर थेट नकारात्मक परिणाम होतो.

अनेकवेळा लोक त्यांचे जुने क्रेडिट कार्ड वापरात नसल्यामुळे ते बंद करतात. यामुळे त्या क्रेडिट कार्डशी संबंधित त्यांचा सर्व आर्थिक इतिहास पुसला जातो. याचा क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.

CIBIl Score
Free Cinema Ticket: चित्रपट पाहण्याचा छंद आहे? मग 'हे' पाच क्रेडिट कार्ड देतील मोफत सिनेमाचं तिकीट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com