6 Visa Free Countries: व्हिसा शिवाय फिरता येणार Out Of India, बजेटमध्ये करा New Year Party Plan

Visa Free Travel Place To Visit For New Year: नवीन वर्ष छान, सुंदर ठिकाणी साजरे करावे अशी अनेकांची इच्छा असते. परंतु जर तुम्हाला येणारे नवीन वर्ष बजेटमध्ये भारता बाहेर फिरायचे असेल तर तुम्ही व्हिसा फ्री देशांचा पर्याय निवडू शकता.
Visa Free Countries To Travel in This New Year
Visa Free Countries To Travel in This New YearSaam Tv
Published On

New Year Travel Trip Ideas:

डिसेंबर महिना सुरु झाला की, अनेकांना वेध लागते ते फिरण्याचे. गुलाबी थंडी आणि सुट्टीच्या दिवसात अनेकजण फिरण्याचे प्लान करतात. गेलेले वर्ष अविस्मरणीय बनवण्यासाठी आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण अनेक प्लान करतो.

नवीन वर्ष छान, सुंदर ठिकाणी (Place) साजरे करावे अशी अनेकांची इच्छा असते. परंतु जर तुम्हाला येणारे नवीन वर्ष बजेटमध्ये (Budget) भारताबाहेर फिरायचे असेल तर तुम्ही व्हिसा (Visa) फ्री देशांचा पर्याय निवडू शकता. असे सहा देश आहेत जिथे भारतीयांना व्हिसाशिवाय फिरता येईल. यासाठी फक्त भारतीय पासपोर्टची गरज लागेल. जगभरात भारतीयांसाठी असे काही देश आहेत जिथे तुम्हाला व्हिसाचीही गरज पडणार नाही. या देशांमध्ये साधारणत: एक ते तीन महिने आरामात प्रवास करु शकता. असे कोणते देश आहेत जेथे नवीन वर्षाच्या पार्टीचा प्लान करता येऊ शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Visa Free Countries To Travel in This New Year
Nashik Tourist Places | गुलाबी थंडीत नाशिक फिरण्याचा प्लान करताय? या पर्यटन स्थळांना भेट द्या

1. थायलंड

थायलंड हा भारतीयांना फिरण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. स्वस्तात मस्त फिरण्यासोबतच मार्च २०२४ पर्यंत येथे व्हिसा शुल्क न भरता फिरता येईल. या ठिकाणी अनेक भारतीय मोठ्या संख्येने येत असतात.

Visa Free Countries To Travel in This New Year
Famous Travel Places In Vasai : मुंबईजवळच्या निसर्गात हरवून जायचंय; वसईतील पर्यटनस्थळे घालतील भुरळ!

2. व्हिएतनाम

व्हिएतनाम सुद्धा भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल सेवा देत आहे. या ठिकाणी जाण्यापूर्वी तुम्हाला व्हिएतनाम इमिग्रेशन विभागाकडून पूर्व-मंजुरी पत्र घेणे आवश्यक आहे. नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणाहून करु शकता.

3. मलेशिया

मलेशिया भारतीयांना व्हिसाशिवाय फिरता येऊ शकते. तसेच येथील पर्यटक स्थितीला आणखी चालना मिळवण्यासाठी भारतीयांना किंवा इतर देशातील पर्यटकांना फिरता येते.

Visa Free Countries To Travel in This New Year
Kolhapur Travel Places: पश्चिम महाराष्ट्रातील निसर्गात हरवून जायचंय; कोल्हापूरमधील पर्यटनस्थळे घालतील भुरळ!

4. भूटान

भूटान हा अतिशय सुंदर देश असून या ठिकाणी सुंदर टेकड्या आणि मैदानांसाठी प्रसिद्ध आहे. भूटान हा नैसर्गिक सौंदर्य आणि प्रेक्षणीय ठिकाणांसाठी खूप प्रसिद्ध आहे. भारतीयांना काही अटींवर व्हिसाशिवाय येथे प्रवास करण्याची परवानगी आहे.

5. नेपाळ

नेपाळी लोक भारतात मोकळेपणाने राहू शकतात. त्याचप्रमाणे भारतीयांनाही नेपाळमध्ये पर्यटनासाठी जाण्याचा आणि काम करण्याचा अधिकारही आहे. माऊंट एव्हरेस्टमुळे या देशाला पर्यटनाच्यादृष्टीने अधिक महत्त्व आहे.

Visa Free Countries To Travel in This New Year
New Year Tour 2024 : बॅग भरो, निकल पडो! बजेटमध्ये फिरा नॉर्थ इंडिया, ७ दिवसांचा IRCTCचा नवा टूर प्लान

6. मॉरिशस

व्हिसाशिवाय फिरता येणाऱ्या देशांमध्ये मॉरिशसचाही समावेश आहे. मॉरिशसमध्ये व्हिसा ऑन अरायव्ह उपलब्ध आहे. मॉरिशसला जाण्याासाठी अनेक कपल्स लोक उत्सुक असतात. येथे तुम्ही सुंदर समुद्रकिनारे आणि जंगल सफारी करु शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com