Shraddha Thik
महाराष्ट्रात असे अनेक पर्यटनस्थळे आहेत जे पर्यटकांना भूरळ घालतात. त्यातील एक नाशिक.
हे वाइनयार्ड्स 3000 एकरमध्ये पसरलेले आहे. येथे द्राक्षाची बाग आणि वाईनरी आहे. मुंबईच्या 180 किमी ईशान्येस आहे. या ठिकाणी नक्कीच भेट द्या
सोमा वाईनचा विस्तार आता लक्झरी रिसोर्टमध्ये करण्यात आला आहे. रिलॅक्स होण्यासाठी आणि सोबतच वाईनचा आस्वाद घेण्यासाठी हे परफेक्ट डेस्टीनेशन आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर वाढोली फाटा इथे असलेल्या शांती - कृष्ण म्युझियम ऑफ मनी अँड हिस्ट्री संग्रहालयात ऐतिहासिक नाण्यांना पाहण्यास भेट देऊ शकता.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले वणी. या ठिकाणी सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊ शकता.
येथे पांडवलेणी 2500 वर्षांपुर्वीपासून नाशकात जपला जाणार ऐतिहासिक ठेवा आहे. ही पांडवलेणी पूर्वी 'त्रैराष्मी लेणी' म्हणून संबोधली जात असे.
भारतातले पहिले चित्रपट निर्माते दादासाहेब फाळके याच्या स्मृतीप्रित्यर्थ नाशिक येथिल पांडवलेणी या स्थळाच्या पायथ्याशी दादासाहेब फाळके स्मारक हे उद्यान बांधले आहे.
पंचवटीमध्ये राज्यातील काही सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरे आहेत. हे भगवान राम, माता सीता आणि भगवान यांचे स्थान मानले जाते.
नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर 1778-1790 मध्ये बांधले.