Shraddha Thik
शिवानी सुर्वे 'Bigg Boss Marathi Season2' मुळे चर्चेत आली होती.
नुकतीच शिवानी 'झिम्मा 2' मध्ये मनालीच्या भूमिकेत दिसली. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
अभिनेत्री शिवानी सुर्वे लवकरच प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सुरू आहे.
शिवानी ही प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य नानावरेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत.
2015 मध्ये 'तू जिवाला गुंतवावे' मालिकेदरम्यान दोघांची पहिली भेट झाली. 2017 मध्ये दोघांनी रिलेशनशिपबद्दल घरी सांगितल्यानंतर कुटुंबीयांकडून विरोध झाला होता.
हे फक्त आकर्षण असू शकतं, असं म्हणत दोन्ही कुटुंबीयांनी सुरुवातीला नकार दिला होता. लॉकडाऊनदरम्यान शिवानी आणि अजिंक्य एकत्र होते.
चार वर्षांनंतर दोघांच्या कुटुंबीयांनी नात्याला परवानगी दिली. शिवानी - अजिंक्य यांच्या लग्नाची प्लॅनिंग सुरु आहे.