Kia Car: बाजारात येणार Kia ची स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉनला देणार टक्कर

Kia Car : कंपनी इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणार आहे. ही कार टाटा नेक्सॉनची प्रतिस्पर्धी कार असेल असं म्हटलं जात आहे. कंपनी या कारची किमत देखील कमी ठेवणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Kia Car
Kia Carcarsales
Published On

Kia Cheap Electric Car :

सध्या बहुतेक कार निर्मात्या कंपन्या ह्या इलेक्ट्रिक कार तयार करणार आहेत. देशातील नंबर एक कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी २०२५ मध्ये आपल्या भागीदार टोयोटासह ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक कार बाजारात आणेल. या क्षेत्रात अजून एक कार निर्माती कंपनी उतरणार आहे. Kia नेही इलेक्ट्रिक कार निर्मिती करण्याची घोषणा केलीय. २०२५ ते मध्ये मास मार्केट सेगमेंटसाठी एक नवीन मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहेत. (Latest News)

मुख्य विक्री आणि व्यवसाय अधिकारी, किया इंडिया म्युंग-सिक शोहन म्हणाले की, या मोठ्या मार्केटमध्ये असलेल्या टाटा नेक्सॉन ईव्हीची किमत जितकी आहे, त्याच किमतीमध्ये किआ कार बाजारात उतरवली जाणार आहे. पण डिझाइन आणि फिचर्स हे इतर कारपेक्षा उत्कृष्ट असतील.. किया इंडियाचे मुख्य विक्री आणि बिझनेस ऑफिसर यांनी सांगितलं की, नवीन मास-मार्केट किआ ई-कार कमी किमतीत उपलब्ध झाल्याने विक्रीचे प्रमाण आणखी वाढेल, अशी कंपनीला आशा आहे. कंपनी एका वर्षात सुमारे १०,००० नवीन Kia EVs तयार करेल अशी अपेक्षा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परंतु कंपनीने नवीन परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारची ड्रायव्हिंग रेंजबाबत कोणताच खुलासा केला नाहीये. नव्या किआची रेंज Nexon EV पेक्षा जास्त असेल. परंतु टाटा नेक्सॉन ईव्ही एसयूव्ही मिड रेंज आणि लाँग रेंज या दोन ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे, म्हणून Myung-Sik Sohn कोणत्या Nexon EV व्हेरियंट श्रेणीविषयी बोलत होते ते जाणून घेणं औत्सुक्याचं ठरेल. MIDC सायकलनुसार, Nexon EV - मिड आणि लाँग या दोन्ही प्रकारांची श्रेणी अनुक्रमे ३२५ किमी आणि ४६५ किमी आहे.

किया ईव्ही ६ ही ५० लाख रुपयांच्या किमतीची प्रीमियम इलेक्ट्रिक कार गेल्या वर्षी प्रथम श्रेणीत होती. गेल्या वर्षी, Kia इंडियाचा EV विभागातील बाजारपेठेतील हिस्सा ३७ टक्के होता, परंतु यावर्षी वाढलेल्या स्पर्धेमुळे कार उत्पादक Kia चा हिस्सा २० टक्क्यांवर आलाय. किया इंडियाचे विक्री आणि विपणन प्रमुख हरदीप सिंग ब्रार यांनी पुढील वर्षासाठी किआच्या ईव्ही उत्पादनांच्या योजनांबद्दलही सांगितले.

कंपनी Kia EV6 ची विक्री सुरू ठेवेल आणि पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये भारतीय बाजारात तिची प्रीमियम इलेक्ट्रिक कार, EV9 लॉन्च करेल. २ ०२५ मध्ये मास मार्केट असलेल्या EV कारला लाँच करून, Kia India 2026 पर्यंत बाजारातील हिस्सेदारी १० टक्क्यांनी वाढवेल.

Kia Car
Maruti Upcoming Car: मारुती सुझुकीच्या 'या' तीन कार बाजारात घालतील धुमाकूळ; जाणून घ्या काय आहेत खास फिचर्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com