Maruti Upcoming Car: मारुती सुझुकीच्या 'या' तीन कार बाजारात घालतील धुमाकूळ; जाणून घ्या काय आहेत खास फिचर्स

Maruti Suzuki : मारुती सुझुकी नवीन वर्षात स्विफ्ट आणि डिझायर कार नवीन फिचर्स अपडेट करून बाजारात आणणार आहे. या दोन कार जोरदार फीचर्स आणि मायलेजसह बाजारात उतरण्यात येणार आहे. याशिवाय कंपनी SUV सेगमेंटवर फोकस करत आहे. नवीन कार लाँच करण्याची तयारी कंपनी करत आहे.
Maruti Suzuki
Maruti Suzukiyandex
Published On

Maruti Suzuki Upcoming Cars:

मारुती सुझुकी भारतीय भारतीय बाजारातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी SUVसेगमेंटवर फोकस करत असून मारुती सुझुकी कंपनी नवीन मॉडेल बाजारात आणणार आहे. Maruti Suzuki कंपनी लोकप्रिय मॉडेल्स स्विफ्ट आणि डिझायर या दोन कारचे पुढील अपडेट व्हर्जन आणणार आहे. नवीन वर्षात मारुती सुझुकी काही नवीन मॉडेल्स पण बाजारात आणण्याची तयारी दर्शवलीय.(Latest News)

नवीन ७-सीटर प्रीमियम SUV

कंपनी मारुती प्रीमियम क्लालिटीची नवीन ७-सीटर SUV बाजारात आणणार आहे. परंतु ही कार कधी बाजारात कंपनीने अजून ही कार कधी बाजारात येईल, त्याचा खुलासा केलेला नाहीये. ही कार जून २०२४ अथवा त्यानंतर बाजारात येऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे. या नवीन कारचे फीचर्स आणि इंजिन ग्रँड व्हिटारा सारखे असू शकतात. या कारमध्ये १.५ लिटर, K १५सी आणि १.५ लिटर हायब्रिड इंजिनचा पर्याय देण्यात आलाय. या कारचे उत्पादन मारुती सुझुकीच्या खरखोदा प्लँटमध्ये करण्यात येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

eVX SUV

मारुती सुझुकी कंपनी भारतीय बाजारमध्ये इलेक्ट्रिक कारही आणणार आहे. eVX कॉन्सेप्टवर ही कार बाजारात येण्यात येणार आहे. ही इलेक्ट्रिक एसयुव्ही ४.३ मीटर लांब असेल. या कारचे उत्पादन सुरू झाले असून कंपनी २०२४ मध्ये सणासुदीच्या हंगमात या कार बाजारात आणणार, असा अंदाज आहे.

नवीन स्विफ्ट आणि डिझायर

मारुती सुझुकी नवीन जनरेशनची स्विफ्ट हॅचबॅक आणि डिझायर सिडेन तयार करणार आहे. या दोन्ही कार २०२४ च्या फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये बाजारात दाखल होतील. या दोन्ही नवीन कार १.२ लीटर, ३-सिलेंडर Z12E पेट्रोल इंजिनसह येईल. या कारला CVT गिअर बॉक्ससोबत जोडण्यात येईल. नवीन स्विफ्ट एक लिटर पेट्रोलमध्ये २४.५० 50 किलोमीटरपर्यंत मायलेज देईल, असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.

Maruti Suzuki
Maruti Brezza:१४ लाख रुपयांची Maruti Brezza घरी आणा फक्त ९७ हजार रुपयात, मायलेज आहे शानदार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com