Sachin Tendulkar Car Collection: 'सचिन'कडे आहेत कोट्यवधींच्या आलिशान कार, मारुती 800 होती पहिली कार

'सचिन'कडे आहेत कोट्यवधींच्या आलिशान कार, मारुती 800 होती पहिली कार
Sachin Tendulkar Car Collection
Sachin Tendulkar Car CollectionSaam TV

Sachin Tendulkar Car Collection : आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे, तो आता 50 वर्षांचा झाला आहे. या खास दिवशी आपण सचिनच्या जबरदस्त कार कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. त्याकडे भारतातील सर्वात स्वस्त कारपासून ते कोट्यवधींच्या स्पोर्ट्स कार्स आहेत.

Sachin Tendulkar Car Collection
Sachin Tendulkar House: 100 कोटींच्या अलिशान बंगल्यात राहतो सचिन तेंडुलकर',पाहा घराच्या आतील फोटो

1. मारुती 800: सचिनची पहिली कार मारुती 800 होती. 1989 मध्ये भारतीय क्रिकेट कसोटी संघात सामील झाल्यावर त्यांनी ही कार खरेदी केली होती.

2. BMW i8: सचिनकडे अनेक BMW कार आहेत आणि BMW i8 त्यापैकी एक आहे. सचिनची ही BMW i8 कार लाल रंगाची आहे. ज्यात DC डिझाइन्सने बदल केले आहेत.

Sachin Tendulkar Car Collection
Sachin Tendulkar Birthday: सचिनसोबत घडला होता विचित्र प्रसंग! डायपर लावून मैदानात उतरला अन् ठोकल्या 97 धावा..

3. BMW 7 Series 760Li: BMW ची 760Li ही एक उत्तम आणि पॉवरफुल कार आहे. या कारमध्ये मेन स्टेप्स, डॅशबोर्ड आणि गिअर नॉबच्या खाली हेडरेस्टवर सचिनचे एसटीचे चिन्ह देण्यात आले आहे. सचिनने आपल्या आवडीनुसार ही कार कस्टमाईज करून घेतली आहे.

BMW 7 Series 760Li मध्ये 6.5-लीटर V12 ट्विन टर्बो इंजिन आहे. जे 601 Bhp कमाल पॉवर जनरेट करते. याला ऑल व्हील स्टीयरिंग फंक्शन देण्यात आले आहे. ज्यामुळे ही सेडान नियंत्रित करणे सोपे होते.

4. BMW M6 Gran Coupe: ही BMW कार अतिशय स्टायलिश आणि पॉवरफुल आहे. ही कार देखील खास बनते, कारण तिचे पहिले मॉडेल सचिनच्या गॅरेजमध्ये समाविष्ट आहे. ही फ्रोझन सिल्व्हर रंगात सचिनकडे आहे. जी फक्त आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com