
Sachin Tenudlkar 50th Birthday: आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी अतिशय खास आहे. कारण आजच्याच दिवशी तेंडुलकर कुटंबात एक गुणवान बाळ जन्माला आलं ज्याने पुढे जाऊन क्रिकेट विश्व गाजवलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक अर्धशतके आणि सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला.
आम्ही कोणाबद्दल बोलतोय यादी कल्पना तुम्हाला आलीच असेल. आम्ही बोलतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) बद्दल. आज सचिन आपला ५० वा वाढदिवस साजरा करतोय. या खास दिवशी आम्ही तुम्हाला सचिनने खेळलेल्या एका अशा इनिंगबद्दल माहिती देणार आहोत जी इनिंग कुठलाही क्रिकेट फॅन विसरू शकणार नाही.
ही गोष्ट २००३ वर्ल्ड कप स्पर्धेतील आहे. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू होता. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये सुरू होता. या सामन्यापूर्वी सचिन डिहायड्रेशनशी झुंज देत होता. अशा परिस्थितीत स्वत:ला फिट ठेवण्यासाठी त्याने पाणी आणि एनर्जी ड्रिंक्ससोबत मीठ घेण्यास सुरुवात केली. या कारणामुळे त्याचे पोट खराब झाले होते. (Sachin Tendulkar Birthday Special)
दुसरा कुठलाही फलंदाज असता तर त्याने अशा परिस्थितीत मैदान सोडण्याचा मैदानात न जाण्याचा निर्णय घेतला असता. मात्र मैदान सोडेल तो मास्टर ब्लास्टर कसला. पोटात बिघाड झाला असूनही सचिनने फलंदाजीला जाण्याचा निर्णय घेतला होता. (Latest sports updates)
त्यावेळी तो अंडवेयरमध्ये टिश्यू पेपर लावून मैदानात उतरला होता. या सामन्यात त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत ९७ धावांची खेळी केली होती. अवघ्या ३ धावांनी त्याचे शतक हुकले होते.(when sachin tendulkar had to wear diapers while batting in cricket match)
मिठाच्या पाण्याने झाला होता त्रास..
सचिनने आपली बायोग्राफीमध्ये हा किस्सा सांगितला होता. ज्यात त्याने लिहिले आहे की, 'त्यावेळी मला डिहायड्रेशनचा त्रास जाणवत होता. त्यामुळे मी पाण्यात एक चमचा मिठ घालून ते पाणी प्यायलो होतो. मला वाटले होते की, याने प्रकृतीत सुधारणा होईल. मात्र उलटेच झाले होत.'
भारतीय संघाने १८३ धावांनी मिळवला होता विजय..
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सचिन तेंडुलकर ९७, वीरेंद्र सेहवागने ६६ आणि सौरव गांगुलीने ४८ धावांची खेळी केली होती.
या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ६ गडी बाद २९२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाकडून एकट्या कुमार संगकाराने ३० धावांची खेळी केली होती. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नव्हती. या सामन्यात भारतीय संघाने १८३ धावांनी विजय मिळवला होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.