Call Forwarding Feature Saam Tv
बिझनेस

Call Forwarding Feature: ऑनलाइन फ्रॉडला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय; कॉल फॉरवर्डिंग सेवा होणार बंद

Ussd Code Call Forwarding Feature To Be Stoped Till 15 April: सध्या ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ऑनलाइन फ्रॉडमुळे अनेक लोकांना आपले पैसे गमवावे लागले आहे. ऑनलाइन फ्रॉडला आळा घालण्यासाठी आता दूरसंचार विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Telecom Company Will Stop Call Forwarding Feature Soon:

सध्या ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ऑनलाइन फ्रॉडमुळे अनेक लोकांना आपले पैसे गमवावे लागले आहे. ऑनलाइन फ्रॉडला आळा घालण्यासाठी आता दूरसंचार विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्याना USSD कोड आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

दूरसंचार विभागाने दिलेल्या आदेशानंतर आता १५ एप्रिलनंतर कॉल फॉर्वर्डिंग सेवा बंद होणार आहे. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन फसवणूकीच्या सर्वाधिक प्रकरणांमध्ये USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवेचा वापर केला आहे. (Latest Business News)

USSD कोड म्हणजे काय?

USSD कोड हा एक शॉर्ट कोड आणि फीचर आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही एक कोड डायल करुन अनेक नंबर किवा सेवा एकाच वेळी सुरु आणि डी-अॅक्टिव्हेट केल्या जाऊ शकतात.

कॉल फॉरवर्डिंग सेवा म्हणजे काय?

कॉल फॉरवर्डिंग सेवा म्हणजे एका कोडच्या साहाय्याने एकापेक्षा अनेक नंबरशी आपण जोडले जाऊ शकतो. या फीचरचे फायदे आणि तोटेही आहेत. दोन नंबर असलेले लोक या सेवेचा लाभ घेतात. यामुळे जर ती व्यक्ती नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असेल तर त्या व्यक्तीला दुसऱ्या नंबरवर कॉल रिसिव्ह करता येतो. या फीचरचा वापर करुन अनेक ऑनलाइन फ्रॉड होतात.

ऑनलाइन फ्रॉड करण्यासाठी स्कॅमर्स *401# USSD कोड वापरतात. याद्वारे अनोळखी व्यक्ती तुम्हाला कॉल करतात आणि *401# डायल करुन अनोळखी नंबरवर कॉल करतात आणि फ्रॉड करतात. त्यामुळे अनोळखी नंबरवरुन कॉल करत असेल तर तो फोन उचलू नका. जर तुम्ही असा कॉल उचलला तर तुमच्या नंबरवर येणारे कॉल किंवा मेसेज दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड केले जातात. त्यामुळे तुमची सर्व माहिती स्कॅमर्सला मिळते. त्यामुळे फसवणूक होते.

ऑनलाइन फ्रॉड रोखण्यासाठी दूरसंचार विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिलपासून कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रबाळे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप खेडकरचा जामीन कोर्टाने नाकारला

Avneet Kaur: पिंक बार्बी डॉल...; अवनीत कौरचा एलिगन्ट ग्लॅमरस लूक पाहिलात का?

WhatsApp चा पर्याय बनवणाऱ्या Zoho Mail चे संस्थापक आहेत 'भारतीय', संपत्तीचा आकडा वाचून धक्का बसेल

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, अचानक आलेल्या पावसाने उडाली पुणेकरांची दाणादाण; पाहा VIDEO

Varicose Veins: ९ ते ५ ऑफिसमध्ये बसून काम करणं धोक्याचं, वेळीच जाणून घ्या नुकसान आणि शरीरावर होणारे गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT