Telecom Price Hike : फोनवर बोलणे महागणार? निवडणुकीनंतर १५ ते १७ टक्के दर वाढण्याची शक्यता

Mobile Companies Hike Call Rates : फोनवर बोलणे लवकरच महागण्याची शक्यता आहे. दूरसंचार कंपन्यांकडून मोबाईधारकांवर दरवाढ लादला जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये १५ ते १७ टक्क्यांनी वाढ होणे अपेक्षित आहे.
Telecom Price Hike
Telecom Price HikeSaam Tv

Mobile Tarrif Hike In 2024 :

फोनवर बोलणे लवकरच महागण्याची शक्यता आहे. दूरसंचार कंपन्यांकडून मोबाईधारकांवर दरवाढ लादला जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये १५ ते १७ टक्क्यांनी वाढ होणे अपेक्षित आहे.

यामध्ये दरवाढीचा सगळ्यात जास्त फायदा (Benefits) भारती एअरटेल कंपनी ठरण्याची शक्यता आहे. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या अहवालानुसार निवडणुकीनंतर दूरसंचार क्षेत्रात १७ टक्क्यांपर्यंत दरवाढीची अपेक्षा केली जात आहे.

यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये दूरसंचार कंपन्यांनी सुमारे २० टक्क्यांनी शेवटची दरवाढ केली होती, असे अहवालात म्हटले आहे. सध्या भारतातील दूसरी आणि महत्त्वाची दूरसंचार कंपनी असलेल्या भारती एअरटेल (Airtel) कंपनीचा सध्याचा महसूल २०८ रुपये इतका आहे.

Telecom Price Hike
Mumbai-Pune Travel Plan : मुंबई-पुण्याजवळ फिरण्याचा प्लान करताय? IRCTC चे भन्नाट टूर पॅकेज पाहा

मागच्या काही वर्षात दर किमान पातळीवर राहिल्यामुळे देशातील दूरसंचार क्षेत्राचा महसूल सातत्याने घसरत आला आहे. सार्वजिनक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएल तर खासगी क्षेत्रातील व्होडाफोन-आयडियाची ग्राहक संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. रिलायन्स जिओच्या आगमनानंतर ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी मोबाईल कंपन्यांमध्ये ग्राहकांना इंटरनेट डेटा कमी प्रमाणात देण्याची सुरुवात झाली आहे.

जिओ (Jio) आणि एअरटेल कंपनीमुळे इतर टेलिकॉम कंपन्यांना अधिकचे नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या एअरटेल २९.४ टक्क्यांवरुन ३३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर जिओ सर्वाधिक वेगाने वाढत २१.६ टक्क्यांवरुन ३९.७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com