Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेअंतर्गत मिळणार दर महिन्याला २०,५०० रुपये; जाणून घ्या

Senior Citizen Saving Scheme : प्रत्येकाला आपल्या भविष्याची काळजी असते. भविष्यात पैशांची चिंता भासू नये म्हणून सर्वजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. नागरिकांसाठी अनेक सरकारी आणि पोस्ट ऑफिसच्या योजना आहे. ज्यात तुम्हाला दर महिना निश्चित उत्पन्न मिळेल.
Post Office Senior Citizen Scheme
Post Office Senior Citizen SchemeSaam TV

Senior Citizen Saving Scheme Benefits:

प्रत्येकाला आपल्या भविष्याची काळजी असते. भविष्यात पैशांची चिंता भासू नये म्हणून सर्वजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. नागरिकांसाठी अनेक सरकारी आणि पोस्ट ऑफिसच्या योजना आहे. ज्यात तुम्हाला दर महिना निश्चित उत्पन्न मिळेल.

पोस्ट ऑफिसमधील ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दरमहिना निश्चित उत्पन्न मिळते. या योजनेत अर्ज करण्यासाठी काही अटी आहेत. (Latest News)

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्ही फक्त १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ३० लाखांपर्यत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत मिळणारे पैसे हे तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर अवलंबून असेल. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कलम 80C अंतर्गत सूट मिळते.

पोस्ट ऑफिस बचत योजना ही ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर नियमित पैसे मिळावे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. सरकार या योजनेवर जवळपास ८.२ टक्के व्याज मिळते. य४ योजनेत जर तुम्ही १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला तिमाहीत १०,२५० रुपये मिळतील. ५ वर्षात तुम्हाला २ लाख रुपयांचे फक्त व्याज मिळते. जर तुम्ही या योजनेत ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली तर वर्षाला तुम्हाला २,४६,००० रुपये व्याज मिळेल.

Post Office Senior Citizen Scheme
Telecom Price Hike : फोनवर बोलणे महागणार? निवडणुकीनंतर १५ ते १७ टक्के दर वाढण्याची शक्यता

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. यात आयकर कलम 80C अंतर्गत दरवर्षी १.५लाख रुपयांची टॅक्स सूट मिळते. या योजनेतील व्याजाचे पैसे दर तीन महिन्याला मिळते.

Post Office Senior Citizen Scheme
RBI:आरबीआयची मोठी कारवाई! शिरपूर मर्चंट बँकेच्या व्यवहारांवर ६ महिने बंदी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com