Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आईपण भारी देवा! UPSC च्या अभ्यासासाठी मुलापासून राहिली २ वर्षे दूर; मिळवली २ रँक; IAS अनु कुमारी यांचा प्रवास

Success Story of IAS Anu Kumari: आयएएस अनु कुमारी यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. यूपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करताना त्या दो वर्षे आपल्या कुटुंबापासून आणि मुलापासून लांब राहिल्या होत्या.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. कधी कधी तर आपल्या कुटुंबापासून लांब राहून अभ्यास करावा लागतो. या सर्व त्यागाचे फळ तुम्हाला मिळते. असंच काहीसं आयएएस अनु कुमारी यांच्यासोबत झालं. यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्या २ वर्षे आपल्या मुलापासून लांब राहिल्या होत्या.

अनु कुमारी यांना पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक कर शकल्या नाहीत. काही गुणांमुळे त्यांचे स्वप्न अर्धवट राहिले. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी खूप मेहनतीने आपले आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. एवढेच नाही तर त्यांनी यूपीएससी परीक्षेत दुसरी रँकदेखील प्राप्त केली.

अनु कुमारी यांचे शिक्षण (IAS Anu Kumari Education)

अनु कुमारी या मूळच्या हरियाणाच्या रहिवासी आहेत. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी फिजिक्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर त्यांनी IMT मधून फायनान्स आणि मार्केटिंगमध्ये मास्टर्स केले. यानंतर २०१२ मध्ये त्यांचे लग्न झाले आणि त्या गुरुग्राम येथे गेल्या.

दोन वर्षांपासून मुलापासून राहिली लांब

अनु कुमारी यांचे स्वप्न आयएएस होण्याचे होते. त्यांनी अभ्यासासाठी आपल्या मुलापासून लांब राहायचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी हे सर्व खूप कठीण होते. पहिल्या प्रयत्नात फक्त १ गुणांमुळे त्यांचे सिलेक्शन राहिले. परंतु त्यांनी मेहनत केली आणि २०१७ मध्ये ऑल इंडिया रँक २ प्राप्त केली.

आयएएस अनु कुमारी या अभ्यासासाठी रोज सकाळी लवकर उठायच्या. त्यांनी १० ते १२ तास अभ्यास केला. याचसोबत त्या रोज ऑल इंडिया रेडिओ ऐकायच्या. टीव्हीवर बातम्या बघायच्या. प्रत्येक मिनिटाचा त्यांनी सदुपयोग केला आहे. याचा त्यांना फायदा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

Andheri Pedestrian Bridge: रेल्वेच्या पादचारी पुलावर महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी; मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

SCROLL FOR NEXT