UPI Rules Saam tv
बिझनेस

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

UPI Rules Changes: यूपीआयच्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आले आहे. आता कलेक्शन रिक्वेस्ट बंद होणार आहे. फसवणूकीला टाळण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhi Hande

आजकाल सर्वकाही डिजिटल झाले आहे. यूपीआयच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन करुन काही सेकंदांमध्ये पेमेंट करता येते. आता यूपीआयच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. आता पीअर २ पीअर (P2P) म्हणजे कलेक्शन रिक्वेस्ट बंद होणार आहे. हे फीचर १ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे.

कलेक्शन रिक्वेस्ट काय आहे?

कनेक्शन रिक्वेस्ट किंवा पुल ट्रान्झॅक्शन हे यूपीआयचे एक फीचर आहे. यामध्ये युजर्स यूपीआयद्वारे कलेक्शन रिक्वेस्ट पाठवतात. म्हणजेच युजर्स दुसऱ्या ग्राहकांकडून पैसे मागण्याची परवानगी देते. अनेकदा हे फीचर वापरुन अनेकांची फसवणूकदेखील झाली आहे. अनेकजण याचा पैसे उकळण्यासाठी वापर करतात. म्हणूनच आता हे फीचर बंद करण्यात आले आहे. दरम्यान, फक्त व्यापारी १ ऑक्टोबरनंतर कलेक्शन रिक्वेस्ट सबमिट करणे सुरु ठेवू शकतात.

हे पेमेंट कसे केले जाते?

व्यापारी ग्राहकाच्या यूपीआय अॅपवर कलेक्ट रिक्वेस्ट पाठवतात. युजर्सने मंजुली दिल्यानंतर यूपीआय पिन टाकल्यावर प्रोसेस केली जाते. यानंतर ग्राहकाच्या खात्यात पैसे कापले जातात.

नवीन नियम काय आहे?

आता सर्व बँका आणि यूपीआय अॅप्सना P2P व्यव्हारांसाठी ट्रान्झॅक्शन करण्याच्या प्रक्रियेस मनाई केली आहे. एक यूपीआय युजर्स दुसऱ्या व्यक्तीकडून जास्तीत जास्त २००० रुपये जमा करु शकतात.

या नवीन नियमांमुळे आता युजर्सची फसवणूक होणार नाही. याआधी असं कोणीही यूपीआय युजर्सला कलेक्ट रिक्वेस्ट पाठवायचे त्यानंतर युजर्स ट्रान्झॅक्शन करायचे. यामुळे अनेकांच्या खिशाला फटका बसला आहे. ही फसवणूक टाळावी, यासाठीच हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आमदार, महापालिका आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांचा रिक्षाने एकत्रित प्रवास

Ajit Pawar: महायुती सरकार धारावी पुनर्विकास करूनच दाखवणार- अजित पवार|VIDEO

शाहजहाँने दिल्लीमध्येच का बनवला लाल किल्ला?

Raigad News: दरडग्रस्तांचं पुनर्वसन रखडलं; 44 कुटुंबांचा स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा|VIDEO

Pune: गंभीर विषयावर बैठक, माजी महापौर गेम खेळण्यात दंग; VIDEO व्हायरल; नागरिक संतापले

SCROLL FOR NEXT