UPI Transaction: UPI युजर्स सावधान! १ ऑगस्टपासून बॅलन्स तपासण्यावर नवा नियम, वाचा सविस्तर माहिती

UPI New Rules : १ ऑगस्ट २०२५ पासून UPI व्यवहारावर नवीन नियम लागू होणार आहेत. बॅलन्स तपासणी, API वापर आणि ऑटो पेमेंटसाठी महत्त्वाचे बदल NPCI कडून जाहीर. सविस्तर माहिती वाचा.
UPI Lite
UPI new rules 2025Saam TV
Published On

सध्या भारतात डिजीटल पेमेंट मोठ्या प्रमाणात लोक करत आहेत. त्यामध्ये UPI पेमेंटचा वापर अगदी वाण्यापासून ते मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत केला जातो. यामध्ये आपण किती पेमेंट केले? किती पैसे शिल्लक राहिलेत? याबद्दल एका मिनिटांत जाणून घेऊ शकतो. मात्र आता यामध्ये काही बदल करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे बदल 1 ऑगस्टपासून करण्यात येणार आहेत. याची माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून देणात आली आहे. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

UPI Lite
Celebrity Gossip : शम्मी कपूर यांना होती रणबीर-दीपिकाच्या लग्नाची आशा म्हणाले, 'मी लग्नासाठी विचार...'

NPCI च्या नव्या आदेशानुसार, UPI पेमेंटचे काही नियम फॉलो केले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्या कारवाया पुढील प्रमाणे आहेत.

१. ३१ ऑगस्टपर्यंत एनपीसीआय लेखी पद्धतीने त्यांना आश्वासन द्यावे लागेल की, सर्व API विनंत्या रांगेत ठेवतील आणि त्यांचा वेग कमी करतील.

२. ग्राहकांच्या परवानगीशिवाय API व्यवहार सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९.३० या दरम्यान बंद राहतील.

३. सतत बॅलन्स तपासणे टाळण्यासाठी बॅंकांना सगळ्यांच्या व्यवहारासोबत शिल्लक रक्कम पाठवावी लागेल.

ऑटोपेमेंटचे नवे नियम

३१ जुलैपासून सगळ्या UPI ग्राहकाना खात्यातील रक्कम तपासण्यासाठी अॅपवरून फक्त ५० वेळाच अनुमती देऊ शकणार आहेत. तसेच जे व्यापारी व्यक्ती आहेत त्यांना खात्यातील रक्कम व्यवहाराची माहिती तपासण्यात अडचणी येऊ शकतात.

असे केल्याने IIPI प्रणाली व्यवस्थित वापरता येणार आहे. शिवाय UPI पेमेंटमुळे, सबस्क्रिप्शनमुळे पैसे कापले जाणे या सेवा सुरळीत राहतील. फक्त नॉन-पीक अवर्समध्ये काम करेल. ऑटोपेमेंटसाठी तुम्हाला १ किंवा जास्तीत जास्त ३ प्रयत्न करता येतील.

UPI Lite
Bhaji Pav Recipe : कुरकुरीत बटाटा भजी, गरमागरम पाव अन् मसालेदार चटणी; नोट करा सोपी रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com