८ कोटींचा IPO, १०८५ कोटींची गुंतवणूक
Share MarketSaam Tv

Share Market : ८ कोटींचा IPO, १०८५ कोटींची गुंतवणूक; कंपनीचा फोटो पाहताच गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमिन सरकली, काय आहे प्रकरण?

Boss Packaging sme ipo of 8 crore gets bid of 1085cr : गुजरातमधील एका कंपनीचा आयपीओ खूप चर्चेत आलाय. कंपनीचा फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Published on

मुंबई : छोट्या कंपन्याच्या आयपीओला मोठी बोली लागत असल्याचे प्रकार सध्या समोर येत आहेत. एसएमई कंपनी बॉस पॅकेजिंग सोल्युशन्सच्या आयपीओची गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड क्रेझ दिसून आली. मात्र, या कंपनीच्या कार्यालयाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसलाय. दिल्लीस्थित कंपनीच्या रिसोर्सफुल ऑटोमोबाईलचा IPO देखील खूप चर्चेत होता. या कंपनीची दोन शोरूम आणि ८ कर्मचारी होती. गुंतवणूकदारांनी १२ कोटीच्या इश्युसाठी ४८०० कोटी रूपयांची बोली लावली होती. परंतु आता आणखी एक कंपनी अशीच चर्चेत आली आहे. या कंपनीचं नाव बॉस पॅकेजिंग सोल्युशन्स आहे. तिचा इश्यु ८ कोटी रूपये होता, परंतु त्याला १०८५ कोटी रुपयांची बोली लागली आहे. ही कंपनी चर्चेत येण्याचे कारण केवळ बंपर सबस्क्रिप्शनच नाहीये तर या कंपनीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

८ कोटींचा IPO, १०८५ कोटींची गुंतवणूक

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ही कंपनी अहमदाबादमध्ये आहे. ती पाचशे स्क्वेअर यार्डच्या छोट्या जागेतून चालते. या कंपनीत ६४ कर्मचारी काम (Share Market)करतात. व्हायरल झालेल्या फोटोत दिसतंय की, या कंपनीच्या कार्यालयाची अवस्था अतिशय बिकट आहे. परंतु गुंतवणूकदार या कंपनीच्या आयपीओसाठी आकर्षित झाले आहेत. बॉस पॅकेजिंगच्या आयपीओला १३६.२१ पट सबस्क्रिप्शन मिळालंय.

कंपनीचा फोटो समोर

बॉस पॅकेजिंग कंपनीचा आयपीओ ३० ऑगस्ट रोजी उघडण्यात आला होती. गुंतवणूकदारांनी त्यात ३ सप्टेंबरपर्यंत पैसे गुंतवले होते. कंपनीचा इश्यू ८.४१ कोटी रुपये होता. त्याअंतर्गत कंपनीने १० रुपये दर्शनी मूल्याचे १२,७४,००० शेअर जारी केले (IPO controversy) होते. शेअर्सची किंमत बँड ६६ रुपये होती. त्याची लॉट साइज २००० शेअर्स होती, म्हणजेच गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी किमान १,३२,००० रुपये गुंतवावे लागले होते. किरकोळ गुंतवणूकदार या आयपीओकडे आकर्षित झालेत. त्यांनी सर्वाधिक १६५.२९ सदस्यता घेतली, तर इतर श्रेणींमध्ये एकूण १०३.८०% सदस्यता घेतली.

सोशल मीडियावर बॉस पॅकेजिंगच्या ऑफिसच्या व्हायरल फोटोंवर चर्चा होत आहे. काहीजणांनी (Boss Packaging sme ipo) जुने फोटो शेअर करून कंपनीला ट्रोल केलं जात असल्याचा दावा केलाय. त्यांनी म्हटलंय की, हे फोटो अनेक वर्ष जुने आहेत. वेबसाईटवर बॉस पॅकेजिंग सोल्युशन्सचे ऑफिस व्हायरल झालेल्या फोटोंपेक्षा पूर्णपणे वेगळे दिसत आहे. कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल विचार केल्यास ३१ मार्च २०१३ रोजी कंपनीकडे ५३६.१२ कोटी रुपयांची मालमत्ता होती. यावर्षी हीच मालमत्ता ३१ मार्च रोजी ७६६.१० कोटी रुपये झालीय. कंपनीचा करानंतरचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १०१.०४ कोटी रूपये आहे.

८ कोटींचा IPO, १०८५ कोटींची गुंतवणूक
Resourceful Automobile IPO : फक्त ८ कामगार असणाऱ्या कंपनीला मिळाले ४८०० कोटी, आयपीओतून छप्परफाड कमाई

काय आहे प्रकरण?

आधी रिसोर्सफुल ऑटो आणि आता बॉस पॅकेजिंग इश्यू साइजच्या अनेक पट सबस्क्रिप्शनमुळे चर्चेत आले आहेत. या छोट्या आयपीओंना प्रत्येक श्रेणीत १०० टक्क्यांहून अधिक बोली कशा मिळाल्या? असा प्रश्न बाजार विश्लेषक उपस्थित करत आहेत.मागील रिसोर्सफुल ऑटोमोबाइल SME IPO ला किरकोळ श्रेणीमध्ये ४१८ पट सबस्क्रिप्शन मिळाले होते. तर बॉस पॅकेजिंग कंपनीची आयपीओची यादी आज जाहीर होणार आहे. ही कंपनी वैविध्यपूर्ण पॅकेजिंग मशीन, स्टिकर लेबलिंग मशीन, कन्व्हेयर्स, टर्नटेबल्स, वेब सीलर्स, इलेक्ट्रिक बोगदे यांचे उत्पादन, पुरवठा आणि निर्यात करते.

बाजार नियामक सेबीने देखील छोट्या कंपन्यांच्या आयपीओमधील गुंतवणुकीला मिळणाऱ्या प्रतिसादाची दखल घेतली आहे. यामुळे २८ ऑगस्ट रोजी नियामक मंडळाने गुंतवणूकदारांना गुंतवणुक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. कंपनीची सकारात्मक परिस्थिती फसव्या पद्धतीने मांडणाऱ्या कंपन्यांपासून सावध राहावे. सोशल मीडिया टिप्स किंवा कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये, असं देखील सेबीने म्हटलं होतं.

८ कोटींचा IPO, १०८५ कोटींची गुंतवणूक
IPO Risk Factors : IPO म्हणजे काय? खरंच कोट्यवधी रुपये कमवता येतात का? गुंतवणुकीत किती रिस्क असते? वाचा A टू Z माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com