Resourceful Automobile IPO : फक्त ८ कामगार असणाऱ्या कंपनीला मिळाले ४८०० कोटी, आयपीओतून छप्परफाड कमाई

Resourceful Automobile IPO Price : रिसोर्सफूल ऑटोमोबाईलच्या अलीकडील IPO ची किंमत केवळ 11.99 कोटी रुपये होती. पण एकूण 400 वेळा सबस्क्राइब करण्यात आलं आहे. त्यामुळे कंपनीला IPO मध्ये 4800 कोटी रुपयांची बोली लागली आहे.
Resourceful Automobile IPO
Resourceful Automobile IPO Saam Digital
Published On

ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच आयपीओ आणून शेअर बाजारात स्वत:ला सिद्ध केलं आहे. यासोबतच अनेक आयपीओ अजूनही रेसमध्ये आहेत. पण शेअर मार्केटमध्ये IPO ची सर्वाधिक चर्चा आहे ती फक्त 8 कर्मचारी असलेल्या कंपनीची. केवळ 8 कायम कर्मचारी असलेल्या कंपनीला 12 कोटी रुपयांच्या IPO साठी 4,800 कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या आहेत, म्हणजेच थेट 400 पट सबस्क्रिप्शन.

Resourceful Automobile IPO
Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाईच्या चरणी सोन्याचा सिंह अर्पण, किंमत माहिती आहे का? एकदा वाचाच

रिसोर्सफूल ऑटोमोबाईलच्या अलीकडील IPO ची किंमत केवळ 11.99 कोटी रुपये होती. पण एकूण 400 वेळा सबस्क्राइब करण्यात आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल क्षेत्रातील बोली 500 पट अधिक होती. त्यामुळे केवळ १.५२ कोटी नफा असलेल्या या कंपनीला IPO मध्ये 4800 कोटी रुपयांची बोली लागली आहे.

या कंपनीची विशेष गोष्ट म्हणजे दिल्लीत यामाहाची 'साहनी ऑटोमोबाइल' नावाची फक्त 2 शोरूम आहेत आणि कंपनीच्या कायम कर्मचाऱ्यांची संख्या केवळ 8 आहे. अशा परिस्थितीत एवढ्या छोट्या कंपनीचा आयपीओ इतका सबस्क्राइब होणे हा नियामकांसाठी चिंतेचा विषय बनतो. त्यामुळे आता छोट्या कंपन्यांचे (एसएमई) आयपीओ लॉन्च करण्याचे नियम अधिक कडक होऊ शकतात, असे संकेत बाजार नियामक सेबीनेही दिले आहेत.

Resourceful Automobile IPO
Maharashtra Politics : वाचाळवीरांमुळे CM एकनाथ शिंदे अडचणीत; वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करणार का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com