Sakshi Sunil Jadhav
पावसाळा आला की, घरात भजी बनवण्याची ईच्छा व्यक्त केली जाते.
चला तर पुढे आपण घरच्या घरी कमी साहित्यात आणि स्ट्रीट स्टाईल भजी पाव कसा बनवायचा हे जाणून घेऊ.kurkurit bhaji pav recipe
बटाट, पाव, लाल सुकी चटणी, बेसन, मीठ, हळद, गरम मसाला, तेल, खाण्याचा सोडा किंवा तांदळाचे पीठ इ.
सर्वप्रथम बटाटे धुवून पातळ स्लाईसमध्ये कापून घ्या.
आता एका मोठ्या भांड्यात बेसन, लाल तिखट, बेसन, मीठ, हळद, गरम मसाला मिक्स करा.
आता मिश्रणातच थोडं थोडं पाणी घालून पीठ जाडसर करून घ्या. शेवटी त्यात तांदळाचे पीठ किंवा सोडा घाला.
आता कढई गरम करा. तेल तापवा आणि भजी तळून घ्या.
दुसरीकडे तवा गरम करून पाव एका बाजूने कुरकुरीत करून घ्या.
आता लाल चटणी पावाला लावून घ्या. त्यात भजी घाला आणि गरमा गरम सर्व्ह करा.