यूपीआय पेमेंटवर आता चार्ज आकारले जाण्याची शक्यता
RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबत संकेत दिले आहेत
लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरल संजय मल्होत्रा यांनी संकेत दिली आहे. यूपीआयद्वारे होणारे पेमेंट हे नेहमी मोफत दिले जाणार नाही. एका मिडिया इव्हेंटमध्ये बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. आता यूपीआय सिस्टीममध्ये कोणत्याही चार्जशिवाय पेमेंट करु शकतात. दरम्यान, सरकार या बँकांना यासाठी सब्सिडी देते. जेणेकरुन यूपीआय सिस्टीम रिअल टाइम पेमेंट इन्फ्रास्टक्चरमध्ये उत्तम रितीने सुरु राहिल.
संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, भारतात डिजिलट पेमेंट सुरक्षित आणि चांगले करण्यासाठी वचनबद्ध आहे. परंतु पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करता येणार आहे. त्यामुळे कोणाला ना कोणाला खर्च करावाच लागणार आहे.
यूपीआय पेमेंटचे वाढते परिणाम
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी यूपीआय पेमेंटशीसंबंधित खर्चाची माहिती दिली आहे. दोन वर्षांत यूपीआयद्वारे होणारे ट्रान्झॅक्शन ३१ कोटींवरुन ६० कोटींवर गेले आहे. यामुळे बॅकअँड पायाभूत सुविधांवर परिणाम झाला आहे. यातील जास्तीत जास्त कामे बँक, पेमेंट सर्व्हिस प्रोवाइडर, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे केले जातात. यूपीआयद्वारे होणारे पेमेंटमुळे सरकारला कोणत्याही प्रकारचा महसूल मिळत नाही. याचसोबत मर्चंट डिस्काउंट रेट सून्य आहे. त्यामुळे इंडस्ट्रीतील अनेक लोकांचे म्हणणे आहे की,आर्थिकदृष्ट्या हे मॉडेल जास्त दिवस सुरु राहणार नाही.
दरात कपात होण्याची शक्यता
यूपीआय (UPI) पेमेंटच्या चार्जेससोबत संजय मल्होत्रा यांनी हेदेखील नमूद केले की, यात दरकपात शक्य आहे. ते म्हणाले की, भविष्यानुसार चलनविषयक धोरणे ठरवली जातात. त्यामुळे सध्याच्या महागाईचे आकडे कमी होणे गरजेचे आहे. पुढच्या ६ ते १२महिन्यात काय परिस्थिती काय असेल हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. सध्या महागाई २.१ टक्के आहे. दोन महिन्यात रेपो रेटमध्ये कपात केली आहे जरी क्रेडिट वाढ झाली असली तरीही ती गेल्या १० वर्षांपेक्षा कमी आहे.
यूपीआयद्वारे पेमेंट करणे मोफत राहणार आहे का?
सध्या यूपीआय पेमेंट मोफत आहे, पण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी संकेत दिले आहेत की भविष्यात शुल्क लागू होऊ शकते.
सरकार यूपीआय सिस्टीमसाठी काय करतं?
सध्या सरकार बँकांना सबसिडी देते, जेणेकरून यूपीआयचा वापर मोफत होऊ शकेल.
यूपीआय पेमेंटमुळे सरकारला काही महसूल मिळतो का?
नाही, यूपीआय सिस्टीममधून सरकारला थेट कोणताही महसूल मिळत नाही.
कधीपासून शुल्क लागू होईल?
याबाबत अजून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही, मात्र भविष्यात पॉलिसी बदलण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.