Siddhi Hande
आजकाल यूपीआय पेमेंटमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. तुम्ही एका क्लिकवर पेमेंट करु शकतात.
यूपीआय पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते.
मात्र, आता तुम्ही इंटरनेटशिवायदेखील पैसे ट्रान्सफर करु शकणार आहात. यासाठी सरकारने खास *99# ही सेवा सुरु केली आहे.
ही USSD आधारित सेवा आहे. ही सेवा *99# या नंबरद्वारे काम करते.
फक्त *99# नंबर डायल करा आणि पैसे पाठवा. यासाठी नेटची गरज लागत नाही.
तुम्हाला सर्वात आधी डायल पॅडवर *99# डायल करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला भाषा निवडायची आहे.
यानंतर यूपीआयवरुन पैसे कोणाला पाठवायचे याबाबत माहिती द्या.
त्यानंतर पिन टाका. यानंतर तुमचे पैसे ट्रान्सफर केले जातील.