Xiaomi 14 Ultra Saam Tv
बिझनेस

iPhone 15 सिरीजला टक्कर देणार Xiaomi चे नवीन फोन, मिळणार जबरदस्त फीचर्स; किंमत किती?

Upcoming Smartphones : चीनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi लवकरच आपल्या स्मार्टफोन्सची नवीन सिरीज जागतिक स्तरावर लॉन्च करणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Xiaomi 14 Ultra:

चीनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi लवकरच आपल्या स्मार्टफोन्सची नवीन सिरीज जागतिक स्तरावर लॉन्च करणार आहे. Xiaomi आपली नवीन Xiaomi 14 सिरीज 25 फेब्रुवारी रोजी मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) दरम्यान लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.

गेल्या वर्षी चीनमध्ये पहिल्यांदा लॉन्च झालेल्या या सिरीजमध्ये Xiaomi 14 आणि 14 Pro चा समावेश होता. जागतिक स्तरावर लॉन्चिंगसाठी Xiaomi एक नवीन व्हर्जन आणण्याचा विचार करत आहे, ज्याला Xiaomi 14 Ultra म्हटले जाईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशी चर्चा आहे की, आगामी 14 अल्ट्रा हा पावरफुल फोन असणार आहे. हा फोन iPhone 14 Pro Max आणि Samsung Galaxy S24 Ultra सारख्या फ्लॅगशिप स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. हा फोन Xiaomi च्या नवीन HyperOS यूजर इंटरफेससह येईल, असं बोललं जात आहे. (Latest Marathi News)

Xiaomi 14 सिरीज किंमत

Xiaomi 14 Ultra ची किंमत Xiaomi 13 Ultra सारखीच असेल. Xiaomi 13 Ultra ची युरोपमध्ये किंमत €1,500 म्हणजेच सुमारे 1.3 लाख रुपये आहे. Xiaomi 13 Ultra ची 12GB व्हेरियंटसाठी RMB 5,999 (अंदाजे 71,600 रुपये) आणि 16GB व्हेरिएंटसाठी RMB 6499 (अंदाजे 77,600 रुपये) किंमत आहे. त्यामुळे 14 Ultra ची किंमतही या सारखीच असेल असे बोलले जात आहे. यातच अशी शक्यता वर्तवली जात आहे की, Xiaomi 14 सुमारे 45,800 रुपये आहे आणि Xiaomi 14 Pro 56,800 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीसह लॉन्च केला जाऊ शकतो.

Xiaomi 14 स्पेसिफिकेशन

Xiaomi 14 सिरीज Qualcomm Snapdragon 8 Gen 3 SoC द्वारे समर्थित आहे. ज्यामध्ये 12 GB LPDDR5X RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज आहे. यात 4,610 mAh बॅटरी पॅक मिळू शकतो. जो 10W वायरलेस रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये एक जबरदस्त डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 6.36-इंच LTPO AMOLED स्क्रीन आहे. जी 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 nits पीक ब्राइटनेसपर्यंत जाऊ शकते.

स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे याचा कॅमेरा. यात Leica-ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 50-मेगापिक्सेल हंटर 900 सेन्सर, 50-मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा समाविष्ट आहे. फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेलचा सेन्सर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mercury transit: 50 वर्षांनंतर नागपंचमीला शनीच्या नक्षत्रात बुध करणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती सुधारणार

राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन पास मध्ये छेडछाड; तारीख बदलवून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वरमध्ये ऑनलाईन दर्शन पासमध्ये छेडछाड करून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT