Smartphone: 10 हजारांपेक्षा कमी किमतीत Redmi A3 स्मार्टफोन लाँच! फीचर्स आणि लूकही जबरदस्त

Redmi A3 Launch In India: स्मार्टफोनमध्ये Redmi ही नावजलेली कंपनी आहे. कंपनीने बुधवारी देशात Redmi A3 स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन नवीन फीचरसह बाजारात लाँच झाला आहे.
Redmi A3 Smartphone
Redmi A3 SmartphoneSaam Tv
Published On

Redmi A3 Price Features And Specification:

सध्याच्या काळात स्मार्टफोन हा अत्यंत महत्त्वाचा आहे. स्मार्टफोनवर जगातील कोणतीही माहिती एका क्लिकवर मिळते. त्यामुळे सर्वांकडेच स्मार्टफोन असतात. तुम्हीही जर नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर नुकताच Redmi A3 स्मार्टफोन लाँच झाला आहे.

स्मार्टफोनमध्ये Redmi ही नावजलेली कंपनी आहे. कंपनीने बुधवारी देशात Redmi A3 स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन नवीन फीचरसह बाजारात लाँच झाला आहे. (Latest News)

या स्मार्टफोनच्या 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत ७,२९९ रुपये आहे. तर 4GB + 128GB व्हेरियंटची किंमत ८,२९९ रुपये आहे. कंपनीच्या 6GB+128Gb स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत ९,२९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन लेक ब्लू, ऑलिव्ह ग्रीन आणि मिडनाइट ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची विक्री २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

Redmi A3 Smartphone
Bridgestone : ब्रिजस्टोन इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी हिरोशी योशिझेन यांची नियुक्ती

Redmi A3 स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G36 SoC प्रोसेसर आहे. Redmi A3 स्मार्टफोन AI सपोर्टसह ड्युअल कॅमेरा सेटअपसह लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन ड्युअल सिम Android 13 (Go Edition) वर चालतो. यात 90 Hz च्या रीफ्रेश रेटसह आणि 120 Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह 6.71-इंचाचा HD+ (1,600x700 पिक्सेल) डिस्प्ले आहे. त्याच्या डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच आणि सेल्फी कॅमेरासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 दिला आहे. Redmi A3 मधील प्रोसेसर 3 GB RAM सह Octacore MediaTek Helio G36 SoC आहे. यात AI सपोर्टसह ड्युअल रियर कॅमेरा युनिटमध्ये 8-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. याच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP कॅमेरा आहे.

Redmi A3 Smartphone
Investment Schemes: सरकारच्या 'या' योजनांमध्ये करा गुंतवणूक; लाखो कमवण्याची संधी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com