Bridgestone : ब्रिजस्टोन इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी हिरोशी योशिझेन यांची नियुक्ती

Bridgestone : योशिझेन या ब्रिजस्टोन जपानमध्ये अनेक नेतृत्व पदांची जबाबदारी सांभाळली आहे. आता ते या नव्या भूमिकेत रुजू होणार आहेत. या नव्या जबाबदारीआधी ते ब्रिजस्टोन टायर सोल्युशन्स जपान कंपनी लिमिटेडच्या बिझनेस, रिटेल आणि सर्व्हिस बिझनसेचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम करत होते.
Hiroshi Yoshizen
Hiroshi YoshizenSaam Tv
Published On

Bridgestone Administrative Director :

टायर व शाश्वत वाहतूक उपाययोजनांच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीच्या कंपनीत मोठी घडामोड झालीय. ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनचा एक भाग असलेल्या ब्रिजस्टोन इंडियाने हिरोशी योशिझेन हे नवीन व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारतील, असे आज जाहीर केले. स्टेफानो सांचिनी यांच्या जागी योशिझेन यांची नियुक्ती करण्यात आलीय. सांचिनी यापुढे युरोपाशी कन्झ्युमर रिप्लेसमेंटचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. (Latest News)

योशिझेन या ब्रिजस्टोन जपानमध्ये अनेक नेतृत्व पदांची जबाबदारी सांभाळली आहे. आता ते या नव्या भूमिकेत रुजू होणार आहेत. या नव्या जबाबदारीआधी ते ब्रिजस्टोन टायर सोल्युशन्स जपान कंपनी लिमिटेडच्या बिझनेस, रिटेल आणि सर्व्हिस बिझनसेचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. ब्रिजस्टोन पूर्व आणि पश्चिमच्या जागतिक पातळीवरील पुनर्रचनेसंदर्भातील ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनच्या अलीकडील घोषणेनंतर हा बदल करण्यात आला आहे.

भारत पूर्व विभागांतर्गत नियुक्त केला जाईल. परिणामी, बीएसएपीआयसी हा विभाग एक एसबीयू-एशिया पॅसिफिक, भारत आणि चीन असा होईल. या भागातील ग्राहकांच्या संवेदना सारख्या आहेत आणि या बाजारपेठा पुढे विकसित करण्यासाठी ब्रिजस्टोनच्या सहयोगितेचा उपयोग करून घेता येईल.भारत ही ब्रिजस्टोनसाठी धोरणात्मक, बदलणारी आणि वृद्धी बाजारपेठ आहे. या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण संधी आणि आव्हाने आहेत.

कारण या देशातील मोटारउद्योग, संख्या व तंत्रज्ञान या दोन्ही पैलूंचा विचार करता बराच वाढत जाणार आहे. आमच्या भागीदारांसोबत आणि ब्रिजस्टोनच्या टीमसोबत काम करण्यास आणि या माध्यमातून आमचे ग्राहक, वाहन उत्पादक आणि समुदायाला सेवा प्रदान करण्यास मी उत्सुक आहे.", असे हिरोशी योशिझेन म्हणाले.

भारतातील माझा कार्यकाळ समाधानकारक होता आणि खूप शिकायला मिळाले. कारण येथील वैविध्यता आणि भारतीय बाजारपेठेतील गुंतागुंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या माझ्या अनुभवाचा माझ्या पुढील वाटचालीस नक्कीच उपयोग होईल, याची मला खात्री आहे. ब्रिजस्टोन आणि बिझनेस पार्टनर्सनी दाखवलेली आपुलकी आणि सहकार्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. 2024 मधील प्रत्येक संधी घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा मला विश्वास आहे.", असे स्टेफानो सांचिनी म्हणाले.

Hiroshi Yoshizen
Paytm Crisis : पेटीएम पेमेंट बँक होणार बंद, हे टॉप ५ पर्याय ठरतील फायदेशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com