Investment Schemes: सरकारच्या 'या' योजनांमध्ये करा गुंतवणूक; लाखो कमवण्याची संधी

Government Investment Schemes: सरकारने नागरिकांच्या हिताच्या असंख्य योजना बनवलेल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही लाखो रूपये कमवू शकता. या योजना कोणत्या आहेत, ते आपण जाणून घेऊ या.
money
moneyyandex
Published On

Know Government Investment Schemes

अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं महत्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी गुंतवणूक अतिशय महत्वाची आहे. सरकारच्या काही योजनांमध्ये गुंतवणूक ( Investment Schemes) करून तुम्ही लाखो रूपये कमवू शकता. या योजनांबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या. (latest investment scheme)

सरकार नागरिकांसाठी अनेक बचत आणि गुंतवणूक योजना राबवित आहेत. यामध्ये चांगल्या व्याजदरावर उत्कृष्ट परताव्याच्या लाभाचाही लाभ मिळतो. पैशांवर सरकारी सुरक्षेची हमी असते. या योजना पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे चालवल्या जातात. सरकारी योजना गुंतवणूकीसाठी (Government Investment Schemes) फायदेशीर असतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नॅशनल पेन्शन योजना

नॅशनल पेन्शन (NPS) ही सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे. यामध्ये देखील, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीवर कर सूट उपलब्ध आहे. कलम 80CCD (1B) अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपये आणि अतिरिक्त 50 हजार रुपये देखील गुंतवू शकता. NPS मध्ये गुंतवणूक करून प्राप्तिकरात एकूण 2 लाख रुपयांची सूट मिळवू (National Pension System) शकता. सरकार एनपीएसलाही प्रोत्साहन देत आहे. तुम्ही प्रति महिना 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता. 18 ते 65 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेत खाते उघडू शकतो. एनपीएस खाते कोणत्याही बँकेत उघडता येते.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samriddhi Yojana) गुंतवणूक करून कर वाचवू शकता. विशेषत: मुलींसाठी सरकारद्वारे चालवली जाणारी ही एक छोटी बचत योजना आहे. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना (SSY) मध्ये खाते उघडून कर वाचवू शकता. या योजनेत वार्षिक जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करून आयकर सूट मिळू शकते. सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याज 8.2 टक्के आहे.

money
PM Kisan Yojana: आनंदाची बातमी! PM किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे पैसे या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही लोकप्रिय बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तुमचे खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडू (Senior Citizen Saving scheme) शकता. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीद्वारे तुम्ही खात्यात जमा केलेल्या रकमेवर 80C अंतर्गत आयकर सूट मिळवू शकता. यामध्ये तुम्ही वार्षिक जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. सुकन्या समृद्धी योजनेप्रमाणेच सरकारने व्याजदरातही बदल करून ते 8.2 टक्के केले आहेत.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) हा एक प्रकारचा इक्विटी फंड आहे. हा एकमेव म्युच्युअल फंड आहे. तो आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट (Equity Linked Savings Scheme) देतो. ELSS मध्ये वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंतच्या परताव्यावर-नफ्यावर कोणताही कर नाही. ELSS मध्ये 3 वर्षांचा सर्वात कमी लॉक-इन कालावधी आहे.

money
Pradhan Mantri Mudra Yojana: स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे? 'या' योजनेद्वारे मिळवा कोणत्याही हमीशिवाय १० लाखांपर्यंत कर्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com