2023-24 हे आर्थिक वर्ष संपणार आहे. कर भरण्याचं अनेकांना टेन्शन आलं आहे. तुम्हाला देखील आलंय का? जर तुम्ही अजून कर बचतीबाबत कोणतेही आर्थिक नियोजन केलं नसेल, तर आजची माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. इन्कम टॅक्स (Income Tax) वाचवायच्या काही टिप्स जाणून घ्या. (Maharashtra News)
चालू आर्थिक वर्ष संपायला थोडाच अवधी शिल्लक आहे. बहुतेक करदात्यांनी आधीच त्याचं आर्थिक नियोजन सुरू केलं असावं. जर तुम्ही अजून टॅक्स सेव्हिंगची योजना आखली (How To Save Income Tax) नसेल. तुम्ही तुमचा कष्टाने कमावलेला पैसा कसा आणि कुठे गुंतवायचा याचा विचार करत असाल, तर ही माहिती फक्त तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला कर वाचवण्यासाठी सध्याच्या सर्वोत्तम पर्यायांबद्दल माहिती देत आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा
कर बचतीसाठी वेळेपूर्वी गुंतवणूक करावी (Tax Saving Tips) लागते. त्यानंतर गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे आयकर विभागाला पुरावा म्हणून द्यावी लागतात. तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत काही योजनांमध्ये गुंतवणूक करून ITR दरम्यान कपातीचा दावा करू शकता. यासाठी तुम्ही विविध सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.
या योजनांमध्ये करबचतीसोबतच परतावाही उत्कृष्ट आहे. यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सुकन्या समृद्धी योजना, PPF, NPS यांचा समावेश आहे. पहिला पर्याय- PPF सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे. ही भारतातील सर्वात लोकप्रिय कर बचत योजना म्हणून लोकप्रिय आहे.
गुंतवणुकीवर कर सूट
सध्या PPF वर 7.1 टक्के दराने व्याज मिळते. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, तुम्हाला पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते. पीपीएफमधील गुंतवणुकीवर सरकार हमी देते. पैसे गमावण्याची भीती नसते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मधील पैसे 15 वर्षे लॉक इन (Income Tax Saving Tips) असतात.
आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करा
आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करून इन्कम टॅक्स तुम्ही वाचवू शकता. तुम्ही प्रीमियम पेमेंटवर खर्च केलेल्या वार्षिक करपात्र उत्पन्नाच्या भागासाठी कलम 80D अंतर्गत कर कपातीचा दावा करू (Government Tax Saving Schemes) शकतात. वयाच्या आधारावर अशा आयकर गणनेतून वेगवेगळ्या रकमांना सूट दिली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.