Income Tax : वर्षाला १२ लाख रुपये कमावताय? हा फॉर्म्युला वापरा, इन्कम टॅक्स भरावा लागणारच नाही

How To Save Tax : अनेकांना ऑफिसच्या एचआरकडून मेल आलाच असेल. ज्यामध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आयकराशी संबंधित गुंतवणूकीचा पुरावा द्या असे म्हटले असेल.
Income Tax
Income TaxSaam Tv
Published On

How To Calculate Salary :

अनेकांना ऑफिसच्या एचआरकडून मेल आलाच असेल. ज्यामध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आयकराशी संबंधित गुंतवणूकीचा पुरावा द्या असे म्हटले असेल. नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरु होणार आहे. याआधी १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

अशावेळी कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूजीचे वातावरण सुरु होते. अशावेळी तुम्ही देखील भाड्याच्या पावत्या, विमा पॉलिसी, राष्ट्रीय पेन्शन योजनेची माहिती घेण्यात व्यस्त होतो. यामुळे अनेकांना कर वाचवण्यात यश मिळते.

कर्मचाऱ्यांना आपले पैसे कशाप्रकारे वाचवता येईल याचा विचार करतात. महिन्याला मिळणारा पगार हा टॅक्स भरण्यात जातो. त्यामुळे करदात्यांना अनेक प्रश्न पडतात. जर तुमचा देखील पगार १० ते १२ लाख रुपयांपर्यंत असेल तर १ ही रुपया कर न भरता टॅक्स (Tax) कसा वाचवता येईल हे जाणून घेऊया.

जर वर्षाला तुमचा पगार (Salary) १२ लाख रुपये (Price) असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरुन टॅक्स वाचवू शकता. कसे ते पाहूया

Income Tax
Gold Silver Rate (19th January 2024): सोन्याच्या भावात ३३० रुपयांनी वाढ, चांदीही चकाकली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचे दर

यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी HR डिपार्टमेंटकडून तुमच्या पगाराचे नीट विभागणी करायला सांगावी लागेल. यावरुन तुम्ही तुमचा पगार १२ लाखांच्या टॅक्सवरती शून्य टॅक्सवर आणू शकता. याशिवाय तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. यामध्ये तुम्ही गुंतवणुकीत घरभाडे भत्ता (HRA), रजा प्रवास भत्ता (LTA), जीवन विमा यांसारख्या गोष्टींचा समावेश असेल.

1. पगार कसा Calculate कराल?

जर तुमचा पगार १२ लाख रुपये असेल तर तुम्हाला तुमच्या पगाराची रचना अशी करावी लागेल. एचआरए ३.६० लाख रुपये, एलटीए रुपये १० हजार आणि टेलिफोन बिल ६ हजार रुपये असेल तर तुम्हाला पगारावर कशी कपात मिळेल जाणून घेऊया.

  • कलम १६ च्या अंतर्गत मानक वजावट रुपये ५० हजार

  • व्यावसायिक करातून २,५०० रुपये सूट

  • कलम १० (१३ अ)अंतर्गत HRA रुपये ३.६० लाख

  • कलम १० (५)अंतर्गत LTA १० हजार रुपये

  • यानुसार तुमचा करपात्र पगार ७ लाख ७१ हजार ५०० रुपये (७,७१,५००)इतकी राहील.

Income Tax
Petrol Diesel Rate (19th January): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग? जाणून घ्या राज्यातील आजचे दर

2. Calculation कसे कराल?

  • कलम 80C अंतर्गत (LIC, PF, PPF, मुलांचे शिक्षण शुल्क) रु. 1.50 लाख

  • कलम 80CCD अंतर्गत टियर-1 अंतर्गत राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) वर रु. 50,000

  • स्वत:चा, पत्नीसाठी आणि 80D वर्षांखालील मुलांचा आरोग्य विमा रु. 25,000

  • पालकांसाठी (ज्येष्ठ नागरिक) आरोग्य धोरणावर रु. 50,000 सवलत

सगळा जमाखर्च वजा करुन किंवा जोडल्यानंतस तुमचे करपात्र उत्पन्न ४,९६,५०० रुपये असेल. यानंतर तुम्हाला करपात्र उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी राहिल्यास करदात्याला त्यावर कोणताही कर भरावा लागत नाही. हा फॉर्म्युला वापरुन तुम्ही १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार नाही.

3. HR ने या गोष्टीला मान्यता न दिल्यास

  • जर कंपनीच्या HR ने तुम्हाला सॅलरीचे कॅलक्युलेशन करुन दिले नाही तर तुमच्याकडे आणखी एक पर्याय उपलब्ध आहे.

  • 2 लाखांच्या गृहकर्जावर सूट.

  • 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट.

  • NPS टियर 1 खात्यावर 50,000 रुपये सूट.

  • मानक वजावट रु. 50,000.

  • पत्नी, मुले आणि स्वत:चा विमा रु. 25,000.

  • पालक किंवा ज्येष्ठ नागरिकांचा विमा रु. 50,000.

  • बचत खात्यावर 10,000 रुपये सूट.

  • कंपनी फक्त 1.70 लाख रुपये एचआरए देत असेल तर एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांच्या आत येईल. त्यामुळे तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com