Realme Days Sale
Realme Days SaleSaam Tv

Realme Days Sale: 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत आहे 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन, फीचर्सही आहेत दमदार

Realme C51: जर तुम्ही एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Realme C51 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Realme Days Sale:

जर तुम्ही एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Realme C51 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. यातच खास गोष्ट म्हणजे कंपनीच्या वेबसाइटवर सुरू असलेल्या Realme Days सेलमध्ये तुम्ही हा फोन 8 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 7,999 रुपये आहे. तुम्ही हा फोन सेलमध्ये 1,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Realme Days Sale
Maruti Suzuki: 33 kmpl मायलेज देणाऱ्या देशातील सर्वात स्वस्त कारवर मिळत आहे 65,000 रुपयांची सूट, नवीन किंमत फक्त 3.34 लाख रुपये!

फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही MobiKwik वॉलेट वापरल्यास, तुम्हाला 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. कंपनीचा हा परवडणारा फोन 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 33 वॅट फास्ट चार्जिंग यांसारख्या जबरदस्त फीचर्सने सुसज्ज आहे. याच स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... (Latest Marathi News)

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनी या फोनमध्ये 6.74 इंच डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याचा टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. हा डिस्प्ले 560 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करतो. 4 GB LPDDR4x रॅम आणि 64 GB स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये Mali G57 GPU सह ऑक्टा-कोर चिपसेट मिळतो.

Realme Days Sale
Flex Fuel Bike: दिसायला कडक अन् चालवायला भारी; Bajaj ने आणली इथेनॉलवर धावणार नवीन Pulsar बाईक

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये LED फ्लॅशसह 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी फोनमध्ये तुम्हाला 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये दिलेली बॅटरी 5000mAh आहे. ही बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

OS बद्दल बोलायचे झाले तर कंपनीचा हा फोन Android 13 वर आधारित Realme UI T Edition वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत. हा फोन मिंट ग्रीन आणि कार्बन ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com