दिल्ली येथे 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान इंडिया मोबिलिटी एक्स्पो 2024 सुरू होता. यादरम्यान, दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटोने त्यांच्या बहुप्रतिक्षित फ्लेक्स-इंधन मॉडेलवर आधारित Pulsar NS160 सादर केली आहे. याव्यतिरिक्त कंपनीने डोमिनार 400 चे फ्लेक्स-इंधन मॉडेल देखील प्रदर्शित केले आहे.
म्हणजेच कंपनीच्या अपकमिंग बाईक पेट्रोलवर धावणार नाही तर फ्लेक्स-इंधनावर धावणार आहेत. यासाठी दोन्ही बाईकच्या इंजिनमध्ये बदल करण्यात आले आहेत. यानंतर ग्राहक इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर ही बाईक चालवू शकतील. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, Dominar 400 आता 27.5 टक्के इथेनॉल पेट्रोल मिश्रित इंधनावर धावणार आहे. Dominar E27.5 आधीच ब्राझीलसह 35 पेक्षा जास्त देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र बाईकच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (Latest Marathi News)
Pulsar NS160 ची सध्याची (एक्स-शोरूम) किंमत भारतात 1.37 लाख रुपये आहे. तर Dominar 400 ची किंमत 2.30 लाख रुपये आहे. या दोन्ही बाईक्स भारतातील ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
दरम्यान, चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देखील या एक्स्पोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. या प्रसंगी बोलताना बजाज ऑटो लिमिटेडचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांनी सध्या सुरू असलेल्या एक्स्पोबद्दल उत्साह व्यक्त केला आणि ते म्हणाले, “आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी सतत नवीन उपक्रम राबवायचे आहेत. आम्ही फक्त पारंपारिक इंधनावर आधारित पर्यायांवर लक्ष केंद्रित केले नाही, तर पर्यायी उपायांवरही लक्ष केंद्रित केले. ते म्हणाले की, वाढत्या तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमतेसह, आज बजाज ऑटो 90 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.