Maruti Suzuki: 33 kmpl मायलेज देणाऱ्या देशातील सर्वात स्वस्त कारवर मिळत आहे 65,000 रुपयांची सूट, नवीन किंमत फक्त 3.34 लाख रुपये!

Maruti Suzuki Alto K10: मारुती सुझुकीने या महिन्यात आपल्या एंट्री लेव्हल आणि देशातील सर्वात स्वस्त कार Alto K10 वर मोठी सूट जाहीर केली आहे.
Maruti Suzuki Alto K10 Discount Offer
Maruti Suzuki Alto K10 Discount OfferSaam Tv
Published On

Maruti Suzuki Alto K10 Discount Offer:

मारुती सुझुकीने या महिन्यात आपल्या एंट्री लेव्हल आणि देशातील सर्वात स्वस्त कार Alto K10 वर मोठी सूट जाहीर केली आहे. कंपनी या कारवर 62,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही सवलत कॅश, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटसह उपलब्ध असेल.

कंपनी आपल्या पेट्रोल आणि CNG दोन्ही मॉडेल्सवर सूट देत आहे. Alto K10 ची प्रारंभिक किंमत 3.99 लाख रुपये आहे. अशातच जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही ही कार अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maruti Suzuki Alto K10 Discount Offer
Flex Fuel Bike: दिसायला कडक अन् चालवायला भारी; Bajaj ने आणली इथेनॉलवर धावणार नवीन Pulsar बाईक

Alto K10 वर उपलब्ध असलेल्या सुटबद्दल बोलायचे झाले तर, याच्या AMT च्या पेट्रोल मॉडेलवर 65,000 रुपये, पेट्रोल MT वर 57,000 रुपये आणि CNG वर 57,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Alto K10 एकूण 8 प्रकारांमध्ये आणि 7 रंग पर्यायांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. याच्या सर्व प्रकारांवर कंपनी किती रुपयांची सवलत देत आहे, हे याची सविस्तर माहिती जाणून घेऊ...  (Latest Marathi News)

कोणत्या प्रकारावर किती आहे सूट

अल्टो K10 पेट्रोल AMT

  • कॅश : 40,000

  • एक्सचेंज : 15,000

  • कॉर्पोरेट :7,000

  • एकूण : 62,000

अल्टो K10 पेट्रोल MT

  • कॅश : 35,000

  • एक्सचेंज : 15,000

  • कॉर्पोरेट :7,000

  • एकूण : 57,000

अल्टो K10 CNG

  • कॅश : 35,000

  • एक्सचेंज : 15,000

  • कॉर्पोरेट :7,000

  • एकूण : 57,000

Maruti Suzuki Alto K10 Discount Offer
Tata Curvv: टाटा मोटर्सची अजून एक दमदार कार; जबरदस्त लूक आणि फीचरसह होणार लाँच

मारुती अल्टो K10 इंजिन

या हॅचबॅकमध्ये नवीन-जनरल K-सिरीज 1.0L ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन आहे. हे इंजिन 49kW(66.62PS) 5500rpm ची पॉवर आणि 89Nm@3500rpm वर टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, याचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट 24.90 km/l मायलेज देते आणि मॅन्युअल व्हेरिएंट 24.39 km/l मायलेज देते. तर याच्या CNG प्रकाराचे मायलेज 33.85 kmpl इतके आहे.

मारुती अल्टो K10 फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Alto K10 कार कंपनीच्या अपडेटेड प्लॅटफॉर्म Heartect वर आधारित आहे. नवीन Alto K10 मध्ये 7 इंची फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. कंपनीने S-Presso, Celerio आणि Wagon-R मध्ये ही इन्फोटेनमेंट सिस्टम आधीच दिली आहे. अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो व्यतिरिक्त, ही इन्फोटेनमेंट सिस्टम यूएसबी, ब्लूटूथ आणि ऑक्स केबलला देखील सपोर्ट करते. स्टिअरिंग व्हीललाही नवीन डिझाइन देण्यात आले आहे. यामध्ये स्टीअरिंगवरच इन्फोटेनमेंट सिस्टमचे माउंटेड कंट्रोल देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com