Poco X6 5G चा नवीन व्हॅरिएंट भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Poco X6 New Variant : Poco X6 5G आता भारतात नवीन व्हॅरिएंटसह लॉन्च करण्यात आला आहे. नवीन व्हॅरिएंट 12GB RAM आणि 256GB स्टोरेज कॉन्फिगरेशनसह बाजारात उपलब्ध आहे.
Poco X6 Launched in New 12gb + 256gb Variant in India
Poco X6 Launched in New 12gb + 256gb Variant in IndiaSaam Tv
Published On

Poco X6 Launched in New 12gb + 256gb Variant in India:

Poco X6 5G आता भारतात नवीन व्हॅरिएंटसह लॉन्च करण्यात आला आहे. नवीन व्हॅरिएंट 12GB RAM आणि 256GB स्टोरेज कॉन्फिगरेशनसह बाजारात उपलब्ध आहे. या हँडसेटच्या रिलीजच्या एका महिन्यानंतर याचा नवीन व्हर्जन लॉन्च करण्यात आला आहे. Poco X6 5G देशात 8GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 512GB स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन Snapdragon 7s Gen 2 SoC वर काम करतो.

Poco X6 5G ची किंमत

नवीन लॉन्च झालेल्या Poco X6 5G च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. हा फोन सध्या मिरर ब्लॅक आणि स्नोस्टॉर्म व्हाइट कलर पर्यायांमध्ये फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Poco X6 Launched in New 12gb + 256gb Variant in India
IRCTC Kashmir Tour Package: काश्मीर फिरण्याची इच्छा होणार पूर्ण! कमी पैशात IRCTC ऑफर करत आहे जबरदस्त टूर पॅकेज

रॅम आणि स्टोरेज

नवीन व्हेरिएंट 8GB + 256GB आणि 12GB + 512GB रॅम आणि स्टोरेज व्हॅरिएंटसह लॉन्च होईल.याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. तर टॉप-एंड मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे.  (Latest Marathi News)

Poco X6 5G स्पेसिफिकेशन

Poco X6 5G Android 14-आधारित HyperOS वर चालतो. हँडसेटला तीन अँड्रॉइड अपग्रेड आणि चार वर्षांची सुरक्षा अपडेट्स मिळतील, असे म्हटले जात आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,800 nits पीक ब्राइटनेससह 6.67-इंच 1.5K (1,220x2,712 पिक्सेल) डिस्प्ले देण्यात आला आहे.

Poco X6 Launched in New 12gb + 256gb Variant in India
Redmi Buds 5 Price: दमदार साऊंडवाले Xiaomiचे Redmi Buds 5 लॉन्च; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

हा फोन Snapdragon 7s Gen 2 SoC वर आधारित आहे. Poco X6 मध्ये 5,100mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Poco X6 5G कॅमेरा

Poco X6 ट्रिपल रियर कॅमेरा युनिटने सुसज्ज आहे. ज्यात OIS सह 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com