IRCTC Kashmir Tour Package Details in Marathi
IRCTC Kashmir Tour Package Details in MarathiSaam Tv

IRCTC Kashmir Tour Package: काश्मीर फिरण्याची इच्छा होणार पूर्ण! कमी पैशात IRCTC ऑफर करत आहे जबरदस्त टूर पॅकेज

IRCTC Kashmir Tour Package 2024: तुम्ही जर कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी भेट देण्याचा विचार करत असाल. तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. IRCTC ने तुमच्यासाठी एक अतिशय जबरदस्त टूर पॅकेज आणले आहे.

IRCTC Kashmir Tour Package 2024:

तुम्ही जर कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी भेट देण्याचा विचार करत असाल. तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. IRCTC ने तुमच्यासाठी एक अतिशय जबरदस्त टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला काश्मीरला भेट देण्याची संधी मिळणार आहे. काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात.

या ठिकाणाचे सौंदर्य शब्दात वर्णन करणे कठीण आहे. काश्मीर उंच पर्वतांनी वेढलेले आहे. याशिवाय काश्मीरमधील सुंदर तलाव या ठिकाणच्या सौंदर्यात भर घालतात. येथे तुम्हाला अनेक सुंदर ठिकाणे पाहायला मिळतील (Srinagar, Pahalgam, Sonmarg, Gulmarg). काश्मीरचे हे सौंदर्य दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते. अशातच IRCTC ने एक जबरदस्त टूर पॅकेज आणले आहे, याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IRCTC Kashmir Tour Package Details in Marathi
Valentine Day Special : प्रत्येक जोडप्याकडे असले पाहिजेत 'हे' महत्त्वाचे कागदपत्र, जाणून घ्या

आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजचे नाव कश्मीर-हेव्हन ऑन अर्थ ईएक्स कोची (KASHMIR-HEAVEN ON EARTH EX KOCHI ) आहे. या पॅकेज कोड SEA13 आहे. हे टूर पॅकेज 4 मार्च 2024 रोजी कोची येथून सुरू होत आहे. (Latest Marathi News)

आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर येथे नेले जाईल. हे आयआरसीटीसीचे फ्लाइट टूर पॅकेज आहे. यामध्ये तुम्हाला विमानात प्रवास करण्याची संधीही मिळणार आहे. तसेच इतर ठिकाणी तुम्हाला कॅबमधून नेले जाईल.

IRCTC Kashmir Tour Package Details in Marathi
Phone Using : ब्रम्ह मुहूर्तात फोनवर वेळ घालवताय? आयुष्यात येऊ शकते मोठे संकट

आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक उत्तम सुविधा देखील मिळणार आहेत. या पॅकेज अंतर्गत, तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. याशिवाय तुमच्या राहण्यासाठी हॉटेलची व्यवस्थाही केली जाईल.

जर आपण याच्या किंमतीबद्दल तर, जर तुम्ही एकट्याने प्रवास करण्याचा विचार करत असाल. तर तुम्हाला 48,440 रुपये खर्च येईल. जर तुम्हाला दोन लोकांसोबत प्रवास करायचा असेल तर. तर तुम्हाला प्रति व्यक्ती 44,270 रुपये किंमत द्यावी लागले. तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 43,070 रुपये खर्च येईल. याच्या अधिक माहितीसाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com