Valentine Day Special : प्रत्येक जोडप्याकडे असले पाहिजेत 'हे' महत्त्वाचे कागदपत्र, जाणून घ्या

Important Documents : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. 14 फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. जर तुम्ही कपल असाल तर तुम्ही एकत्र चर्चा करून आर्थिक बाबींकडे लक्ष द्यावे.
Valentine Day Special
Valentine Day SpecialSaam Tv
Published On

Important Documents In Couples :

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. 14 फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. जर तुम्ही कपल असाल तर तुम्ही एकत्र चर्चा करून आर्थिक बाबींकडे लक्ष द्यावे. तुम्ही नवीन नातेसंबंध सुरू करत असाल किंवा अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहात तर तुमच्याकडे सुरक्षित भविष्यासाठी आवश्यक आर्थिक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. हे कागदपत्र तुमच्या हिताचे संरक्षण करतात आणि तुमची आर्थिक स्थिरता सुनिश्चित करतात. चला तर जाणून घेऊया ती कोणती कागदपत्रे आहेत जी प्रत्येक जोडप्याकडे असायला हवीत.

एकत्र बँक खाते

जोडप्यांसाठी एकत्र बँक खाती उघडणे सामान्य आहे. एकत्र खात्यासह, तुम्ही तुमचे घरगुती खर्च आणि आर्थिक उद्दिष्टे सहज पूर्ण करू शकता. एकत्र बँक खात्यात स्पष्ट अटी व शर्ती असाव्यात ज्यात दोन्ही पार्टनरचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांची रेषा दर्शविली जाते. भविष्यात संघर्ष टाळण्यासाठी हा करार पूर्णपणे वाचणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे.

जीवन विमा पॉलिसी

आजच्या अनिश्चित जगात जोडप्यांकडे जीवन विमा पॉलिसी असणे आवश्यक आहे. तुम्ही स्वतंत्र किंवा संयुक्त जीवन विमा पॉलिसी घेऊ शकता. यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडल्यास तुमच्या जोडीदाराची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित होईल. तुमची आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक परिस्थितीत कोणतेही बदल सामावून घेण्यासाठी वेळोवेळी तुमच्या पॉलिसींचे पुनरावलोकन आणि अपडेट (Update) करण्याचे सुनिश्चित करा.

Valentine Day Special
तुम्हीही Single आहात का? स्वत:सोबत अशा पद्धतीने Valentine Day Celebrate करा

विवाह प्रमाणपत्र

विवाह प्रमाणपत्र हा भारतातील जोडप्यांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हे तुमचे लग्न कायदेशीररीत्या प्रमाणित करते आणि तुमच्या भागीदारीचा पुरावा म्हणून काम करते. विविध आर्थिक व्यवहारांमध्येही याचा वापर होतो. यामध्ये संयुक्त कर्ज, विमा पॉलिसी किंवा संयुक्त खाती उघडण्यासाठी अर्ज करणे समाविष्ट आहे. तुमच्याकडे अद्ययावत आणि वैध विवाह प्रमाणपत्र असल्याची खात्री करा.

मालमत्ता दस्तऐवज

जर तुम्ही दोघांनी मिळून मालमत्ता खरेदी केली असेल तर संपत्तीशी संबंधित सर्व कागदपत्रे ठेवा. यामध्ये खरेदी करार, टायटल डीड, कर्जाची कागदपत्रे आणि नोंदणी प्रमाणपत्रे यांचा समावेश आहे. ही कागदपत्रे केवळ मालकीचा पुरावा नसून मालमत्ता हस्तांतरण, कर्ज आणि कायदेशीर बाबींमध्येही महत्त्वाची आहेत.

Valentine Day Special
Valentine Astrology | 'या' राशींच्या लोकांचे प्रेम जुळणार, तुमची रास आहे का यात?

टॅक्स रिटर्न आणि आर्थिक विवरण

जोडप्यांनी टॅक्स रिटर्न आणि आर्थिक स्टेटमेंटच्या नोंदी ठेवणे महत्त्वाचे आहे. ही कागदपत्रे (Documents) आयकर रिटर्न योग्यरित्या भरण्यात आणि कर कायद्यांचे पालन सुनिश्चित करण्यात मदत करतात. याशिवाय ही कागदपत्रे तुमच्या आर्थिक आरोग्याचे स्पष्ट चित्रही देतात. हे आर्थिक नियोजन आणि कर्ज घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com