Google Chrome तात्काळ अपडेट करण्याचा सरकारने दिला इशारा, नेमकं कारण काय?

Google Chrome Update: जर तुम्ही गुगल क्रोम युजर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. भारत सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमनेGoogle Chrome युजर्ससाठी एक अलर्ट जारी केला आहे.
Google Chrome Update
Google Chrome UpdateSaam Tv
Published On

Google Chrome Update:

जर तुम्ही गुगल क्रोम युजर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. भारत सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) Google Chrome युजर्ससाठी एक अलर्ट जारी केला आहे. CERT-In ने म्हटले आहे की, Google Chrome च्या एका व्हर्जनमध्ये अनेक त्रुटी आहेत. ज्या युजर्सरच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका सिद्ध होऊ शकतात.

सरकारने या सर्व त्रुटी आपल्या अलीकडील सुरक्षा नोट CIVN-2024-0031 मध्ये स्पष्ट केल्या आहेत. सरकारी रिसर्च टीमने सांगितलं आहे की, सध्या अनेक Chrome युजर्सला धोका आहे. यातच 114.0.5735.350 व्हर्जनच्या आधी Google Chrome OS च्या युजर्सला अधिक धोका आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Google Chrome Update
Google Chrome 15 Years Complete : 15 वर्षांचा झाला गुगल क्रोम! खास फीचर्ससह रंगरूप बदलणार, सुंदर पिचाईंनी ट्वीट करून दिली माहिती

ज्या स्मार्टफोनमध्ये Android 11, 12, 12L, 13 आणि 14 आहेत, त्यांनी फोन त्वरित अपडेट करणे आवश्यक आहे. अँड्रॉइड फोनमधील या त्रुटींमुळे हॅकर्स तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी अॅक्सेस करू शकतात.  (Latest Marathi News)

साइड पॅनल सर्च करताना आढळल्या त्रुटी

सरकारी रिसर्च टीमनुसार, हॅकर्स साइड पॅनल सर्च फीचरचा वापर करून डेटा चोरत आहेत. तुम्ही तुमच्या ब्राउझरच्या सुरक्षिततेला देखील बायपास करू शकता.

Google Chrome Update
Iphone New Feature: आयफोनचं भन्नाट फीचर! पाण्यातही बिनदिक्कत वापरता येणार फोन?

अशा प्रकारे करा Google Chrome अपडेट

> Google Chrome उघडा.

> त्यानंतर विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करा.

> त्यानंतर हेल्पमध्ये जाऊन गुगल क्रोम निवडा.

> अपडेट उपलब्ध असल्यास, Chrome ला ते ऑटोमॅटिक डाउनलोड आणि इन्स्टॉल करू द्या.

> अपडेट इन्स्टॉल झाल्यावर क्रोम रीस्टार्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com