Google Chrome 15 Years Complete : 15 वर्षांचा झाला गुगल क्रोम! खास फीचर्ससह रंगरूप बदलणार, सुंदर पिचाईंनी ट्वीट करून दिली माहिती

Google Chrome : Google Chrome हे सध्या जगातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक वापरले जाणारे Search Engine आहे.
Google Chrome 15 Years Complete
Google Chrome 15 Years Complete Saam Tv
Published On

15 Years Completing Chrome :

तुम्ही स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरत असाल तर तुम्ही गुगल क्रोम देखील वापरत असाल. Google Chrome हे सध्या जगातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक वापरले जाणारे Search Engine आहे. तुम्ही दिवसातून अनेक वेळा गुगल क्रोम वापरला असेल पण तुम्ही कधी त्याला किती वर्ष झाले असेल असा विचार केला आहे का? जर तुम्हाला माहित नसेल तर Google Chrome ला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत.

जगभरात 2 अब्जाहून अधिक लोक Google Chrome वापरतात. जेव्हाही आपल्याला कोणत्याही वेबसाइटला (Website) भेट द्यायची असते तेव्हा सर्वप्रथम Google Chrome ला भेट दिली जाते. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स आणत असते. आता जगातील सर्वात मोठा ब्राउझर 15 वर्षांचा होणार आहे, कंपनी यूजर्ससाठी अनेक नवीन अपडेट्स आणणार आहे. गुगलने घोषणा केली आहे की क्रोम वापरकर्त्यांना लवकरच प्लॅटफॉर्मवर एक मोठे अपडेट मिळणार आहे.

Google Chrome 15 Years Complete
Google Chrome Update: सरकारने दिला युजर्सना इशारा! त्वरीत गुगल क्रोम अपडेट करण्याचे आदेश, कारण काय?

युजर्सना हे नवीन फीचर्स मिळणार आहेत

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कन्फर्म केली आहे की गुगल क्रोम ब्राउझरमध्ये लवकरच अनेक नवीन सुरक्षा फीचर्स (Features) जोडली जाणार आहेत. एवढेच नाही तर येत्या काही दिवसांत डेस्कटॉप यूजर्सना नवीन डिझाईनमध्ये क्रोम ब्राउझर दिसेल. आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये माहिती देताना गुगलने सांगितले की, लवकरच त्याचा लोडिंग स्पीड वाढणार आहे. त्यांनी सांगितले की ब्राउझरमध्ये सेव्ह केलेले पासवर्ड सेव्ह करण्यासाठी नवीन फीचर्स देखील जोडले जातील.

सुंदर पिचाई यांनी X वर पोस्ट केले की सप्टेंबर महिन्यात आणखी एक मोठा टप्पा पूर्ण होणार आहे. हे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. या महिन्यात गुगल क्रोम (Google Chrome) 15 वर्षांचे होईल आणि या निमित्ताने त्याच्या डेस्कटॉप आवृत्तीला नवीन रूप दिले जाईल. यामध्ये वापरकर्त्यांना आता सुलभ नेव्हिगेशन, आधुनिक डिझाइन तसेच अधिक कस्टमायझेशन पर्याय मिळतील.

Google Chrome 15 Years Complete
Google Pixel 8 Series Launch : स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच प्री-ऑर्डर सुरू, कधी होणार ग्रँड लॉंचिंग? पाहा काय आहे प्लान

वापरकर्ते थीम बदलण्यास कॅपेबल असतील

गुगलने नुकतेच अँड्रॉईड यूजर्समध्ये बदल केले आहेत. यासोबतच कंपनीने क्रोम ब्राउझरची कलर स्कीम देखील बदलली आहे. Chrome चिन्ह आता नवीन रंग पॅलेटमध्ये डिझाइन केले आहेत. वापरकर्ते क्रोममधील त्यांच्या प्रोफाइलमधून तिची थीम देखील बदलू शकतील. वापरकर्त्यांना आता ब्राउझरमध्ये ओएस लेव्हल सेटिंग्ज देखील मिळतील. आता क्रोम एक्स्टेंशन देखील जलद ऍक्सेस करता येतात. कंपनी लवकरच क्रोम ब्राउझरमध्ये AI फीचर देखील वाढवणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com