Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: फायदाच फायदा, पोस्ट ऑफिसच्या १० जबरदस्त योजना! तुम्ही कुठे गुंतवणूक केली?

Top 10 Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर नागरिकांना चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या सर्वाधिक व्याज देणाऱ्या १० योजनांबद्दल जाणून घेऊया.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी गुंतवणूक करतात. यामध्ये ते वेगवेगळ्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये चांगले व्याजदर मिळते. त्यामुळे मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना चांगला फायदा होता. कमी गुंतवणूकीत चांगला नफा मिळवून देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या काही योजनांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये ४ ते ८.२ टक्के व्याजदर मिळते. सुकन्या समृद्धी योजनेत सर्वाधिक व्याजदर मिळते. ८.२ टक्के व्याजदर या योजनेत दिले जाते.

1. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट

पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही ५०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात.या योजनेत कमीत कमी गुंतवणूकीवरही व्याजदरही दिले जाते.

2. नॅशनल सेव्हिंग रिकरिंग डिपॉझिट अकाउंट

या योजनेत तु्म्ही कमीत कमी १०० रुपये गुंतवणूक करुन अकाउंट उघडू शकतात. या योजनेत जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतात. या योजनेत चक्रिवाढ व्याज दिले जाते.

3. नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट

नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट योजनेत तुम्ही एक वर्ष, दोन वर्ष आणि ५ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात.

4. नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम अकाउंट

नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम अकाउंटमध्ये तुम्ही १००० रुपयांपासून ते अगदी ९ लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते.

5. ज्येष्ठ नागरिक बचत प्रमाणपत्र

ज्येष्ठ नागरिक बचत प्रमाणपत्र योजनेत तुम्ही १००० ते ३० लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला ८.२ टक्के व्याजदर मिळते.

6. पब्लिक प्रोविडंट फंड

पब्लिक प्रोविडंट फंडमध्ये तुम्ही ५ हजार ते १,५०,००० रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात.यामध्ये तुम्हाला ७.१ टक्के व्याजदर मिळते.

7. सुकन्या समृद्धी योजने

सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही २५० रुपयांपासून ते १,५०,००० रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला ८.२ टक्के व्याजदर मिळते.

8. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

या योजनेत तुम्ही १००० रुपयांपासून बचत करु शकतात. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.या योजनेत७.७ टक्के व्याजदर दिले जाते.

9. किसान विकास पत्र

किसान विकास पत्र योजनेत १००० रुपयांपासून गुंतवणूक केली जाते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.या योजनेत ७.५ टक्के व्याजदर दिले जाते.

10. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट

या योजनेत तुम्ही १००० रुपयांपासून ते २ लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभेवर जाणार का? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?

Saam Exit Poll : ठाकरे गटाची तोफ धडाडणार? गुहागर कोण जिंकणार? एक्झिट पोलचा अंदाज आला

Maharashtra Exit Poll: सावंतवाडीमधून शिंदे गटाचे दीपक केसरकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Nallasopara Exit Poll: नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की बहुजन विकास आघाडी कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

World : जगातील 'या' देशात १२ नाही तर आहेत चक्क 13 महिने

SCROLL FOR NEXT