Toll Plaza Saam Tv
बिझनेस

Toll Plaza: आता टोल नाक्यावर रोख रक्कम कायमची बंद; सरकारचा मोठा निर्णय

Toll Plaza to Go Cashless: टोलबाबत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता टोल नाक्यावर रोख रक्कम स्विकारणे बंद केले जाणार आहे. १० एप्रिलपासून हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत.

Siddhi Hande

टोलबाबत महत्त्वाचा निर्णय

आता टोल नाक्यावर कॅश व्यव्हार होणार नाहीत

फक्त फास्टॅग किंवा यूपीआयद्वारे व्यव्हार करता येणार

राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता देशातील सर्व टोल प्लाझावर रोख रक्कम घेतली जाणार नाहीये. आता सर्व टोल नाक्यावर फक्त डिजिटल पेमेंट घेतले जाणार आहे. १० एप्रिलपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आता १० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवर रोख रक्कम घेतली जाणार नाही.

टोल प्लाझावर रोख रक्कम कायमची बंद

सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर रोख रक्कम घेणे बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. यानंतर हे पाऊल उचलण्यत आले होते. यानंतर टोल पूर्ण डिजिटल पद्धतीने स्विकारला जाणार आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याआधीच सांगितले होते की, आता सर्व टोल पेमेंट फक्त फास्टॅग (FASTag) किंवा यूपीआयद्वारेच करावे लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, लेनची क्षमता वाढवून प्रवास सुलभ करणे, टोल प्लाझावरील गर्दी कमी करणे, टोल व्यव्हारांमध्ये पारदर्शकता आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

प्राधिकरणाने सांगितले की, डिजिटल पेमेंटकडे वळल्याने राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील १,१५० पेक्षा जास्त टोल नाक्यावर वाहतूक व्यवस्थित होईल. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

फास्टॅग पासचे दर वाढले

सरकारने काही टोल नाक्यावरील टोल दरात सुधारणा केली आहे.याचसोबत फास्टॅग वार्षिक पासचे दर वाढवले आहेत. याआधी फास्टॅग वार्षिक पास ३००० रुपयांना होता. त्यानंतर या पासची किंमत आता ३०७५ रुपये झाली आहे. प्रवाशांना अतिरिक्त ७५ रुपये मोजावे लागणार आहेत. हा पास १ वर्षासाठी वॅलिड असणार आहे. याचसोबत तुम्ही २०० ट्रीपपर्यंत या पासचा वापर करु शकतात. फक्त राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना या पासचा वापर करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT