FASTag Annual Pass Price: हायवेवरुन प्रवास करणे महागणार! १ एप्रिलपासून फास्टॅग पास फी वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? वाचा

FASTag 2026 Price: १ एप्रिल 2026 पासून फास्टॅग वार्षिक पासची किंमत 3000 रुपये राहणार नाही. तसेच 200 ट्रिप किंवा एक वर्ष वैधता असेल. 31 मार्चपर्यंत जुन्या दरात पास घेण्याची शेवटची संधी आहे.
FASTag 2026 Price
FASTag Annual Pass Price Increased from April 1google
Published On

हायवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. येत्या नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2026-27 पासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून FASTag वार्षिक पासच्या शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे. १ एप्रिल 2026 पासून या पासची किंमत 3000 रुपयांवरून 3075 रुपये करण्यात येणार आहे. म्हणजेच या किमतीमध्ये एकूण 75 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. हा आकडा लहान वाटत असला तरी सर्वसामान्यांच्या खिशाला याने चांगलीच कात्री लागणार आहे.

FASTag ही एक इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रणाली आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर कॅशलेस टोल पेमेंटची यामध्ये सुविधा दिलेली असते. याचा वार्षिक पास हा रोज प्रवास करणारे काढत असतात. त्यांच्यासाठी हा सोयीस्कर पर्याय असतो. यामध्ये एकदाच रक्कम भरायची असते. मग वाहनचालकांना टोल नाक्यांवर थांबण्याची गरज लागत नाही. तसेच प्रवास जास्तीत सोयीस्कर होतो.

नव्या आर्थिक वर्षानुसार वार्षिक पासची वैधता एक वर्ष किंवा 200 टोल क्रॉसिंगपर्यंत असणार आहे. 200 ट्रिप पूर्ण झाल्यानंतर हा पास आपोआप सामान्य FASTag म्हणजेच 'पे-पर-यूज' मोडमध्ये बदलला जातो. त्यानंतर पुन्हा पास अ‍ॅक्टिव्ह करावा लागतो.

FASTag 2026 Price
Belly Fat Loss: पोटावरची चरबी वाढत चाललीये? सकाळी १ ग्लास प्या हे ड्रिंक, आठवड्यातच जाणवेल फरक

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, जे वाहनचालक नवीन पास घेण्याचा किंवा पास रिन्यू करण्याचा विचार करत आहेत, त्यांना 31 मार्चपर्यंत जुने दर लागू होतील. त्यामुळे कमी दरात पास घेण्याची ही शेवटची संधी मानली असणार आहे. किंमत जरी वाढली असली तरी FASTag च्या वार्षिक पासचे अनेक फायदे आहेत.

जसे की, टोल प्लाझावर कमी वेळात व्यवहार पूर्ण होतो, रोख रकमेची गरज लागत नाही आणि तसेच प्रवास करणाऱ्यांसाठी हा पर्याय खूप सोपा ठरणार आहे. त्याचा वापर फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील 1150 टोल प्लाझांवरच करता येतो. राज्य महामार्ग किंवा खासगी टोल रोडवर हा पास लागू होत नाही. तुम्ही याची माहिती Rajmarg Yatra अ‍ॅप किंवा NHAI च्या अधिकृत वेबसाइटवरसुद्धा मिळवू शकता.

FASTag 2026 Price
Belly Fat Loss: पोटावरची चरबी वाढत चाललीये? सकाळी १ ग्लास प्या हे ड्रिंक, आठवड्यातच जाणवेल फरक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com