NHAI Recruitment
NHAI RecruitmentSaam Tv

NHAI Recruitment: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नोकरीची संधी; पगार ₹१,७७,५०० ; अर्ज कसा करावा?

NHAI Recruitment 2025: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे. डेप्युटी मॅनेजर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
Published on

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सरकारी नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी तुम्हाला मिळणार आहे.NHAI मध्ये डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (NHAI Recruitment)

NHAI Recruitment
NABARD Recruitment: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार ३ लाख रुपये महिना; पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. nhai.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचं आहे. या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जून आहे. त्यामुळे त्यापूर्वी तुम्ही अर्ज करावेत. याअंतर्गत ६० पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये बीई/बीटेक पदवी प्राप्त केलेली असावी.

NHAI भरती (National Highway Authority Of India Recruitment)

एनएचएआयमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी निवड झाल्यावर लेव्हल १०अंतर्गत ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्तादेखील मिळणार आहे. या नोकरीबाबत अधिसूचना तुम्ही वेबसाइटवर जाऊन पाहा. चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

NHAI Recruitment
Central Bank Recruitment: कोणतीही परीक्षा न देता मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी;७वी पास ते पदवीधर उमेदवार करु शकतात अर्ज;जाणून घ्या सविस्तर

जर तुम्हाला सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये कामाचा अनुभव असेल तर ही चांगली संधी आहे.ही नोकरी करताना तुम्हाला चांगला अनुभव मिळणार आहे. या अनुभवाचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होणार आहे. यामुळे तुम्हाला इतर अनेक ठिकाणी करिअर करण्याची संधी निर्माण होईल.

NHAI Recruitment
Highest Salary Job: भारतातील सर्वांत जास्त पगार देणारी नोकरी कोणती आहे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com