Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate: ग्राहकांना दिलासा! आज सोन्याचे भाव जैसे थे वैसे; आठवड्याच्या शेवटी भाववाढीला ब्रेक

Gold Rate Today 17th May 2025: आज सोने-चांदीच्या भावात कोणतेही बदल झालेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आठवड्याच्या शेवटी सोने-चांदीचे भाव स्थिर आहेत.

Siddhi Hande

सध्या सोन्याचे भाव सतत वाढत आहे. सोन्याचे भाव वाढत असल्याने ग्राहकांनी सोने-खरेदीकडे पाठ फिरवली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसातदेखील सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी नव्हती.गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान, आज सोन्याच्या भाववाढीला ब्रेक लागला आहे.आज सोन्याचे भाव जैसे थे वैसे आहेत. जाणून घ्या आजचे भाव

गु़डरिटर्न्सनुसार, आज सोन्याच्या भावात कोणताही बदल न झाल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. आज २४ कॅरेट सोन्याचे दर ९५,१३० रुपये प्रति तोळा आहे. कालदेखील १ तोळ्याची किंमत एवढीच होते. ८ ग्रॅम सोने हे ७६,१०४ रुपयांवर विकले जात आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत थोडी कमी आहे. २ कॅरेट सोने प्रति तोळा ८७,२०० रुपयांवर विकले जात आहे. तर ८ ग्रॅमची किंमत ६९,७६० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत ७१,३५० रुपये प्रति तोळा आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ५७,०८० रुपये आहे. (Today Gold Rate)

हॉलमार्कचे सोने घेणे फायदेशीर (Buying Hallmark Gold Is Beneficial)

सोने खरेदी करताना नेहमी हॉलमार्कचे सोने घेण्याचा सल्ला दिला जातो. सोन्यात केडीएम आणि हॉलमार्क असे दोन प्रकार असतात. हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेची हमी देते. हे सोने शुद्ध असते. जर तुम्ही हॉलमार्कचे सोने घेतले तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. हॉलमार्कच्या दागिन्यांना भारतीय मानक ब्युरो (BIS) कडून प्रमाणपत्र मिळते.

चांदीचे दर (Silver Rate)

चांदीच्याही दरात कोणतेही बदल झालेले नाही. चांदीचे दर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहे. ८ ग्रॅम चांदीची किंमत ७७८ रुपये आहे. तर १० ग्रॅम चांदीची किंमत ९७० रुपये झाली आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,७०० रुपये झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गंगापूर धरणातून सध्या 6336 क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू

Satara News : प्रेम प्रकरणातून साताऱ्यात कांड, विवाहितेची राहत्या घरी निघृण हत्या, १२ तासात आरोपीला पुण्यात बेड्या

Ramayana : 'रामायण'मध्ये तगडी स्टार कास्ट; रणबीर, साई पल्लवी ते यश, कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन?

Crime: मायलेकीला खोलीत डांबून ठेवलं, भोंदूबाबाकडून अंगावर चटके देत अमानुष मारहाण; यवतमाळमध्ये खळबळ

Interesting Fact: ऐकूनही विश्वास बसणार नाही! असा साप जो स्वतःवरच करतो हल्ला

SCROLL FOR NEXT