PAN 2.0 कसं बनवाल? अवघ्या ५ मिनिटांत करा अप्लाय; स्टेप बाय स्टेप प्रोसस जाणून घ्या

How To Apply For PAN 2.0: पॅन कार्ड २.० व्हर्जन लाँच झाले आहे. सर्वांनी पॅन कार्ड २.० बनवायचे आहे. अवघ्या ५ मिनिटांत तुम्ही PAN 2.0 साठी अप्लाय करु शकतात.
PAN 2.0
PAN 2.0Saam Tv
Published On

पॅन कार्ड (Pan Card) हे प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आयकर विभागाकडून प्रत्येकाला पॅन कार्ड दिले जाते. पॅन कार्डचे आता २.० (Pan Card 2.0)व्हर्जन लवकरच सुरु होणार आहेत. यामध्ये आता तुम्हाला डिजिटल पॅन कार्ड मिळणार आहे. तुम्हाला क्यु आर कोडसह ई-पॅन मिळणार आहे. म्हणजेच हा क्यू-आर कोड स्कॅन केल्यानंतर तुमची सर्व माहिती मिळणार आहे. हे पॅन कार्ड २.० सर्वांसाठी असणार आहे. तुम्हाला हे पॅन कार्ड मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या.

PAN 2.0
Aadhaar-PAN Cancel: मृत व्यक्तीचे पॅन-आधार कार्ड रद्द कसं करायचं? आजच करा हे काम, अन्यथा होईल मोठं नुकसान

पॅन 2.0 कसं बनवाल? (How To Get PAN 2.0)

पॅन कार्ड २.० बनवण्यासाठी तुम्हालाजास्त काही करायची गरज नाही. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने हे पॅन २.० साठी अप्लाय करावे लागणार आहे.यासाठी फक्त ५ मिनिटाचा कालावधी लागणार आहे. (PAN 2.0 Apply Online Process)

  • पॅन २.० साठी तुम्हाला सर्वप्रथम NSDL e-PAN पोर्टल किंवा UTIITSL च्या वेबसाइटवर जावे लागणार आहे.

  • यानंतर तुम्हाला तुमचा पॅन नंबर, जन्मतारीख आणि आधार नंबर टाकायचा आहे.

  • यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. ती माहिती भरुन व्हेरिफिकेशन पूर्ण करायचे आहे.

  • यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. हा ओटीपी टाकायचा आहे.

  • ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला सर्व अटी-शर्ती वाचून मान्य करायच्या आहेत.

  • यानंतर तुम्हाला पेमेंट करायचे आहे. ५० रुपये तुम्हाला ऑनलाइन भरायचे आहे.

  • यानंतर तुम्हाला तुमचे e-PAN मिळणार आहे. २४ तासाच्या आत तुमच्या ई-मेल आयडीवर हे पॅन कार्ड तुम्हाला मिळणार आहे.

PAN 2.0
Aadhaar : आधारकार्ड बंद होणार? कागदपत्रांची कटकट कायमची संपणार? व्हायरल मसेजमागचं सत्य पाहा

पॅन 2.0 चे फायदे (PAN 2.0 Benefits)

पॅन 2.0 हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्हाला नेहमी पॅन कार्ड खिशात घेऊन फिरायची गरज नाही. तुम्हाला जिथे गरज आहे तिथे डिजिटल पॅन कार्ड दाखवा. त्यानंतर क्यू-आर कोड स्कॅन करुन तुमची सर्व माहिती मिळवू शकतात. यामुळे सर्व कामे सोपी होणार आहे.

PAN 2.0
EPFO: ऑनलाइन PF काढायचाय? ऑनलाइन पद्धतीने ५ मिनिटांत करा अर्ज, ५ दिवसांत अकाउंटमध्ये येतील पैसे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com