EPFO: ऑनलाइन PF काढायचाय? ऑनलाइन पद्धतीने ५ मिनिटांत करा अर्ज, ५ दिवसांत अकाउंटमध्ये येतील पैसे

Online PF Withdrawal Process: कर्मचारी काही आप्तकालीन परिस्थितीत पीएफ काढू शकतात. पीएफ काढण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.
EPFO
EPFO Saam Tv
Published On

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या पगारातील ठरावीक रक्कम जमा केली जाते. पीएफ खात्यातील पैसे ही एक गुंतवणूक असते. तुम्ही हे पीएफचे पैसे आप्तकालीन परिस्थितीत काढू शकतात. यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीनेदेखील अप्लाय करु शकतात.

ईपीएफ म्हणजे कर्मचारी प्रोविडेंट फंड ही सरकारी योजना आहे. या योजनेत कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही पीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा करतात. या योजनेत काही रक्कम तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन म्हणून मिळते. या योजनेत तुम्ही गरजेच्या वेळी पैसे काढू शकतात. ऑनलाइन पद्धतीने पीएफ काढण्याची प्रोसेस जाणून घ्या.

EPFO
PF Calculation: तुमचा PF किती कट होतो? तो कसा मोजला जातो?

पीएफ काढण्यासाठी काय करावे? (PF Withdrawal Process)

तुमचे UAN अकाउंट नंबर हा अॅक्टिव असणे गरजेचे आहे. आधार, पॅन कार्ड तुमचे बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे.

यानंतर तुमचे KYC (Know Your Customer)वर जाऊन वेरिफाइड करा.

पीएफ काढण्यासाठी ऑनलाइन स्टेप्स (PF Withdrawal Online Process)

सर्वात आधी EPFO सदस्य पोर्टल वेबसाइटवर जावे.

यानंतर UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

यानंतर Sign In वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला केवायसी करायचे आहे. त्यानंतर तुमचे आधार, पॅन आणि बँक डिटेल्स वेरिफाइड करा.

यानंतर ऑनलाइन सर्व्हिसमध्ये जा. त्यानंतर Claim (Form 31,19,10C,10D)वर क्लिक करा.

यानंतर बँक डिटेल्स वेरिफाय करा. यानंतर पुन्हा एकदा अकाउंट नंबर टाका.

यानंतर क्लेमचा टाइप निवडा.

EPFO
कॅन्सल चेक अन् व्हेरिफिकेशनची झंझट संपली; आता PF साठी ऑनलाइन क्लेम करणे होणार आणखी सोपं; EPFOची मोठी घोषणा

यानंतर Form 19 संपूर्ण पीएफ काढण्यासाठी निवडा.

Form 10C हा पेन्शन काढण्यासाठी निवडा.

Form 31 अॅडव्हान्स काढण्यासाठी निवडा (मेडिकल, लग्न, शिक्षण)

यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती भरायची आहे.

यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे.

पीएफ काढण्यासाठी किती दिवस लागतात?

पीएफ काढल्यानंतर साधारणपणे ५ ते १० दिवसात तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतात.

EPFO
EPFO: कंपनी खरंच तुमच्या PF अकाउंटमध्ये पैसे जमा करते का? एक मिस्ड कॉल द्या अन् करा चेक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com