Director-Actress : अभिनेत्रीला जवळ ओढलं, कमरेत हात टाकला अन्...; प्रसिद्ध दिग्दर्शकानं मर्यादा ओलांडल्या, VIDEO तुफान व्हायरल

K Raghavendra Rao Video : प्रसिद्ध दिग्दर्शकाचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात तो दोन अभिनेत्रींसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. ज्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले.
K Raghavendra Rao Video
Director-ActressSAAM TV
Published On

प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल रविपुडी यांच्या आगामी चित्रपटाच्या लाँचिंग दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ज्येष्ठ चित्रपट निर्माते के राघवेंद्र राव (Kovelamudi Raghavendra Rao) हे चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ते अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि कृती शेट्टी यांच्यासोबत दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये ८४ वर्षीय राघवेंद्र राव अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि कृती शेट्टी यांचे हात धरून त्यांना स्वतःकडे ओढत ओपनिंग शॉट दिग्दर्शित करताना दिसत आहेत. यावर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. के राघवेंद्र राव यांना ट्रोल करण्यात येत आहे. व्यंकटेश डग्गुबती, नंदामुरी कल्याणराम, कीर्ती सुरेश आणि कृती शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी चित्रपटाचा लाँच सोहळा गुरुवारी हैदराबादमध्ये पार पडला. पारंपरिक मुहूर्त सोहळ्याचा भाग म्हणून ओपनिंग शॉट दिग्दर्शित करण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक राघवेंद्र राव यांना आमंत्रित करण्यात आले होते. निर्माते अल्लू अरविंद यांनी ओपनिंग क्लॅप दिला. निर्माते दिल राजू, सुरेश बाबू आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.

व्हायरल व्हिडिओमध्ये राघवेंद्र राव शॉटसाठी कलाकारांना योग्य स्थितीत उभे करताना दिसत आहेत. सुरुवातीला ते कीर्ती सुरेशचा हात धरून तिला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतात नंतर आपला विचार बदलून कृती शेट्टीला हात पकडतात. ते व्यंकटेश आणि कल्याणराम यांना सीनसाठी कलाकारांच्या खांद्यावर हात कसे ठेवायचे याबद्दल सूचना देताना दिसतात. काहींनी राघवेंद्र राव यांच्या वागणुकीवर टीका केली, तर काहींनी त्यांचे समर्थन करत म्हटले की, ते फक्त ओपनिंग शॉटचे दिग्दर्शन करत होते आणि कलाकारांना त्यांच्या जागेबद्दलचे मार्गदर्शन करत होते. "हा म्हातारा माणूस नेहमी स्पर्श करण्याचा प्रयत्न का करतो?" दुसऱ्याने युजरने लिहिलं की, "हा म्हातारा मूर्ख कोण आहे? त्याला महिलांना त्यांच्या संमतीशिवाय स्पर्श करण्याचा अधिकार कोणी दिला?" तिसऱ्या युझरने लिहिले, "तो महिलांना असा स्पर्श का करतो? त्यांना स्पर्श न करताही तो तेच दृश्य करू शकला असता. विचित्र आहे..."

राघवेंद्र राव यांच्या या क्लिपमुळे निहारिका कोनिडेलाच्या जुन्या वादावरची चर्चा पुन्हा सोशल मीडियावर रंगली आहे. या व्हिडीओत राघवेंद्र राव हे त्याच्या जवळ फोटोसाठी उभ्या राहिलेल्या निहारिकाच्या कमरेत हात घातल्याचे दिसत आहे. अस्वस्थ वाटल्यामुळे अभिनेत्री दिग्दर्शकाचा हात हात बाजूला करते. त्यानंतर अभिनेत्री मागे जाऊन फोटोसाठी पोझ देते.

K Raghavendra Rao Video
Shraddha Kapoor - Eetha Video : श्रद्धा कपूरच्या 'ईथा'चा अंगावर काटा आणणारा टीझर, कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com