Manasvi Choudhary
मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी 'अप्सरा' म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळीने केवळ अभिनयाच्या जोरावरच नव्हे, तर तिच्या सोज्वळ आणि ग्लॅमरस स्टाईलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
प्राजक्ता माळी हे मराठी सिनेसृष्टीतील एक असे नाव आहे, ज्याने नाटक, मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शो आणि स्वतःच्या बिझनेसमध्येही यशाचे शिखर गाठले आहे.
दमदार अभिनय, नृत्य आणि व्यावसायिकतेची छाप पाडल्यानंतर आता प्राजक्ता एका नव्या आणि मोठ्या प्रवासासाठी सज्ज झाली आहे.
मराठी सिनेसृष्टीत धुमाकूळ घातल्यानंतर प्राजक्ता आता थेट दाक्षिणात्य सिनेसृष्टीत म्हणजेच टॉलिवूडमध्ये झळकणार आहे.
आता प्राजक्ता माळीने तिचा नवीन प्रवास सुरू केला आहे. लवकरच प्राजक्ता माळी टॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.
प्राजक्ता तेलुगु चित्रपटामध्ये काम करत आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे अशी माहिती आहे.
प्राजक्ता माळी चित्रपटात असल्यामुळे या चित्रपटाची कथा काय आहे? चित्रपटातील प्राजक्ता माळीची भूमिका काय असेल ? आणि चित्रपट रिलीज कधी होणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.